सोलापुर

वागदरी प्रा.आरोग्य केंद्रात रूग्णाची गैरसोय होणार नाही – तानवडे

वागदरी / नागप्पाा आष्टगी

अक्कलकोट , दि. १० :- वागदरी येथील प्रा.आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणा-या रूग्णाची गैरसोय होणार नाही,या कडे लक्ष देण्याचे आदेश वैद्यकिय अधिका-याना देण्यात आल्याची माहिती जि प पक्ष नेते आनंद तानवडे यांनी दिली आहे.

अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील प्रा.आरोग्य केंद्रातील रूग्णाचे गैरसोय बाबत दि.९ रोजी दै.पुण्य नगरीत बातमी प्रसिध्द झाली होती.बातमीची दखल घेऊन जिल्हा वैद्यकिय अधिकारी डाँ.बी टी जमादार ,जि प पक्ष नेते आनंद तानवडे ,तालुका वैद्यकिय अधिकारी डाँ.करजखेड,यांनी वागदरी प्रा .आरोग्य केंद्रास भेट देऊन चौकशी केली.व वैद्यकिय अधिकारी बरोबर चर्चा केली.या वेळी जि पक्ष नेते तानवडे यांनी प्रा.आरोग्य केंद्रातील कर्मचा-या विषयी असलेली तक्रार व समस्या विषयी जिल्हा वैद्यकिय अधिका-यासमोर मांडले.कर्मचारी वेळेवर कामावर येत नाहीत,वैद्यकिय अधिकारी गैरहजर असतात ,योग्य उपचार मिळत नाही अशी ओरड रूग्णाची आहे.त्यामुळे वैद्यकिय अधिकारी याकडे लक्ष घालुन चौकशी करण्याबाबत तानवडे यांनी मागणी केली.
त्यानंतर वैद्यकिय अधिकारी डाँ . जमादार यांनी वागदरी प्रा.आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकारी डाँ.राजेंद्र बनसोडे,डाँ.साधना पाटील व कर्मचा-यांना दररोज सकाळी ८.३० ते १२.३० व दुपारी ४ ते ६ पर्यंत प्रत्येक कर्मचारी कामावर असणे बंधनकारक आहे.रूग्णाचे गैरसोय होऊ नये या कडे लक्ष देण्याचे आदेश दिले. वागदरी येथील काही लोक कर्मचा-यांना जाणुन बुजुन त्रास देतात.त्यामुळे वागदरीला वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी येण्यास तयार होत नसल्याचे डाँ.जमादार यांनी सांगितले.ग्रामस्थांनीच अशा लोकांची बंदोबस्त करण्याची विनंती केले. कामचुकार कर्मचा-यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

114 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close