बुलढाणा

करवंड जि. प. शाळेत विषारी बिन विषारी सर्प कार्यशाळा संपन्न

प्रशांत पाटील यांनी सापांविषयी असलेली भीती व गैरसमज दूर केले

अमीन शाह

बुलडाणा , दि. १० :- शेतकरी संघर्ष समितीचे समनव्यक शेख मुक्तार यांनी करवंड येथे शासकीय विविध योजना व सर्प कार्यशाळेच आयोजन केले होते.
शेतकरी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी गावातील भटक्या जमाती मधील शिकलकर समाज बांधवांच्या समस्या ऐकून घेतल्या व त्यांच्या जातीच्या दाखल्या विषयी असलेल्या समस्या निवारण करण्यासाठी व इतर योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले,
मार्गदर्शन शिबिर नंतर सर्प मित्र दीपक सुरडकर यांनी सोबत आणलेल्या विषारी व बिन विषारी सापांच्या प्रजाती विषयी शेतकरी व जि. प.शाळेतील विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली, प्रशांत ढोरे पाटील यांनी स्वतः साप पकडून विद्यार्थी व नागरिकांच्या मनात सापांविषयी असलेले गैरसमज व भीती दूर केली,सर्पमित्रांनी सोबत आणलेल्या साप वन्यजीव विभागाचे फिल्ड ऑफिसर जी.डी. मोरे व वनरक्षक एस.एन अंभोरे यांच्याकडे अभयारण्यात सोडण्याकरीता हस्तांतरित केले,
या कार्यक्रमात शेतकरी संघर्ष समितीचे प्रशांत ढोरे पाटील,विनायक सरनाईक,अनिल वाकोडे,डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीचे मोहसीन खान , अनुलोमचे शरद घुबे , समाज सेवक रवींद्र डाळीमकर, सर्प मित्र दीपक सुरडकर, विजय भटकर, विशाल वाघ, श्रीकांत चव्हाण, जय मोरे, प्राणी क्लेश समितीचे सदस्य प्रवीण अंभोरे,पत्रकार फारुक शेख,यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

सर्व मान्यवरांचे करवंड ग्रामस्थांच्या वतीने पुष्गुच्छ देवून सत्कार करण्यात आला, या कार्यक्रमासाठी सरपंच भास्कर अडळकर, मुक्तार शेख, रामेश्वर इंगळे, संतोष जरहाड, मदन जाधव, किशोर राठोड, अनिल जोशी, शिवाजी जाधव, सोनू सपकाळ, पोलीस पाटील, यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

14 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close