नांदेड

माहुर – ईद ए मिलादुन्नबी शांततेत व उत्साहात साजरी.

मजहर शेख

“जुलुस काढुण दिला शांततेचा संदेश “

नांदेड / माहुर , दि. १० :- हजरत महंमद पैगंबर यांची जयंती (जश्‍ने ईद-ए-मिलादुन्नबी) रविवार आज रोजी माहूर शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील गौसीया मस्जिद जवळून टिपू सुलतान चौका पासुन विविध भागातून हजरत सरकार सोनापिर दरगाह पर्यंत सकाळी 9 वाजता मिरवणुक काढण्यात आली.ईदनिमित्त मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या.

दरवर्षी प्रमाणे शहरातील मूस्लिम बांधवांच्या वतीने ईद ए मिलादून्नबी अर्थात इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्य शहरातुन शांततेत नाथखानीने भव्य जुलुस काढुण जगाला शांततेचा, मानवतेचा संदेश देण्यात आला.जुलुसमध्ये शहरातील गौसीया व नगीणा मस्जिद परीसरासह विविध भागातील शेकडों अबालवृध्द तरूण सहभागी होते.यावेळी उपस्थितीत नागरिकांना हाजी कादर भाई दोसाणी यांनी मिठाई वाटप केली. जुलुसच्या निमित्याने उपविभागिय पोलिस अधिकारी जाधव,पो नी लक्ष्मण राख, व पोलिस कर्मचार्यांनी चौख बंदोबस्त ठेवला होता.माजी नगराध्यक्ष फिरोज दोसाणी,साजिद मजीद खान,प्रा. भगवान राव जोगदंड यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.जुलुस यशस्वी करण्यासाठी मौलाना अंजार रजा,नुर खा पठान,जमिर मलनस,अजीज भाई, शब्बीर दुंगे,जावेद टेलिफोन,शेख सत्तार,साजीद खाकरा,इरफान शेख,इम्रान शेख,सोयब शेख,इम्रान खान,आरीफ भाई, सय्यद मोसिन, अजरोद्दीन सय्यद ,अय्याज खान,वजिर मामु,सलिम शेख,ऐजाजभाई, मुस्त्कीम,जब्बार बावाणी,इरफान कलात, व इतरांनी प्रयत्न केले.

65 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close