वाशिम

ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त कारंज्यात निघाली भव्य मिरवणूक

शेकडो मुस्लिम भाविकांचा सहभाग: विविधरंगी पगडी व हिरव्या ध्वजाने वेधले लक्ष

प्रतिनिधी – कारंजा (लाड)

कारंजा , दि. १० :- मुस्लिम समाजाचे धर्मगुरू हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त शहरातून १० नोव्हेंबर रोजी भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये शेकडो मुस्लिम भाविक सहभागी झाले होते. विविध रंगी पगडी,पांढरे वस्त्र आणि हिरवे ध्वज हे मिरवणुकीचे विशेष आकर्षण होते.

जुलूस-ए-मोहंमदी अर्थात मिरवणूकीला सोमवारी सकाळी ८.३० वाजता स्थानिक जामा मस्जिद येथून सुरुवात करण्यात आली. या वेळी इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत महंमद पैगंबर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काही वचने म्हणण्यात आली. मिरवणूकीत सजविलेल्या गाड्या, हिरव्या पताका, शुभेच्छा देणारे फलक घेऊन आबालवृद्धांसह मदरशांचे विद्यार्थी सहभागी होते. डोक्यावर विविधरंगी पगडी अन् अंगात पांढरे वस्त्र अशा पारंपरिक वेशात मुस्लिम बांधवांनी सराफा लाईन, मेन रोड , दिल्ली वेश, इंदिरा गांधी चौक, नेहरू चौक, जनरल स्टोअर्स लाईन, टिळक चौक , अमर चौक, दरोगा मस्जिद चौक, भाजी बाजार, जीजामाता चौक,अस्ताना, पोलीस स्टेशन, नगर परिषद, जे.सी.हाईस्कूल, चवरे लाईन, जे.डी.चवरे हाईस्कूल, बीबी साहबपुरा, काझीपुरा, महात्मा फुले चौक, जुना सरकारी दवाखाना, नगीना मस्जिद, सराफा बाजार या मार्गाने शिस्तबद्ध मिरवणूक काढली. जामा मस्जिद येथे मिरवणूकीचा समारोप करण्यात आला. मिरवणूकीत शहरातील विविध भागातील मंडळांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला होता.

ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त मुस्लिमबहुल वस्त्यांमध्ये पताके, झेंडे लावून सजावट सुद्धा करण्यात आली होती. तसेच मिरवणूकीमध्ये सहभागी भाविकांसाठी सामाजिक संघटना व सामाजिक कार्यकत्र्यांकडून अल्पोपहार व थंडपाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मिरवणूकीत जामा मस्जिद चे मौलाना अ.मजीद साहब, मौलाना काजी मो.इक्बाल, हाफिज सैय्यद, काँग्रेस नेते मो.युसुफ पुंजानी यांच्या सह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येत सहभागी झाले होते. मिरवणुकीदरम्यान शांतता व सुव्यवस्था कायम करण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पाटील, शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार एस.एम.जाधव यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

63 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close