Home महत्वाची बातमी कंधार येथे सदगुरू आश्रम शाळेत रक्तदान शिबिर संपन्न….!

कंधार येथे सदगुरू आश्रम शाळेत रक्तदान शिबिर संपन्न….!

347

नांदेड , दि. ३१ – ( राजेश भांगे ) – नोबेल कोविड १९ कोरोना व्हायरने देशात व राज्यात हाहाकार माजविला असुन. कोरोना व्हायरस च्या विरोधात चालु असलेल्या या लढाईत रक्ताचा तुटवडा भासु लागल्याने तरूणांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात सहाय्य करावे असे राज्याचे आरोग्य मंत्री मा, राजेश टोपे यांनी आवाहन केल्याचे समजताच,
लोकनेते संस्थापक मार्गदर्शक जेष्ठ स्वातंत्र्य सैनानि माजी आमदार भाई गुरूनाथरावजी कुरूडे साहेबांनी कंधार तहसिलदार व आरोग्याधिकारी यांना पत्र लिहुन परवानगी घेतली आणि नांदेड येथील रक्तपेढि कंपनीचे चे प्रमुख श्री नारायण मस्के यांना पाचारण केले. तसेच कंधार शहरातील सर्व नागरिकांना व तरूणांना रक्तदान शिबिरात रक्तदान करण्याचे आवाहन केले. यावेळी कै.उल्हास मेमोरिय ट्रस्ट कंधार संचलित, सदगुरू आदिवासी आश्रम शाळा बहाद्दरपुरा येथे दि. ३१ मार्च रोजी सकाळी ११वा आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन भाई गुरूनाथरावजी कुरूडे यांचे हस्ते करून रक्त संकलनाच्या कार्यक्रमास सुरवात करण्यात आले. तरी यावेळी रक्तदान शिबिरात रक्तदान करत्यांनी एकमेकांन मध्ये सामाजिक अंतर ठेवत मोठ्या संख्येने हाजेरी लावुन रक्तदान केले. या रक्तदान शिबिराच्या वेळी सरपंच माधवराव पेटकर , उपसरपंच गुरुनाथ विठ्ठलराव पेटकर, डॉ. फिसके साहेब कंधार ग्रामीण रुग्णालय, मुख्याध्यापक जाधव सर, विशाल टेकाळे सर व अधीक्षक शेख सर, सौ आडे मॅडम, कदम सर, मोरे सर, कोकले सर, निलेश गायकवाड, नितीन टेकाळे, प्रदीप इंदुरकर ,बळीराम पेठकर,घाटोळ गंगाधर मारुती शिवपुजे गणेश गजानन कावळे व समस्त शिक्षक व गावकरी मंडळी आदिंची उपस्थित होती.