ताज्या घडामोडी

कुंडलवाडीचे न.प.उपाध्यक्ष कुडमुलवार यांच्या वर गुन्हा दाखल करण्याची पत्रकाराची मागणी….!!

बिलोली प्रतिनिधी

नांदेड , दि. १८ :- बातमी का छापली या कारणा वरुन तालुक्यातील कुंडलवाडी येथील भाजपाचे नगराध्यक्षा चे पती तथा उपनगराध्यक्ष विठ्ठल कुडमुलवार यांनी मोबाईल द्वारे मराठवाडा केसरीचे जिल्हा प्रतिनिधी महेंद्र गायकवाड यांना ऐकेरी भाषेचा वापर करुन धमकी दिली या प्रकरणी बिलोली तालुक्यातील सर्व पत्रकारांनी या घटनेचा निषेध करत तात्काळ योग्य ती चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

दै.मराठवाडा केसरीचे जिल्हा प्रतिनिधी महेंद्र गायकवाड यांनी कुंडलवाडी न.प.ची नियमबाह्य ई निविदा प्रकरणी जिल्हाधिका-या कडुन चौकशी चे आदेश या मथाळ्या खाली बातमी प्रकाशित केली होती.या बातमीने संतप्त झालेले नगराध्यक्षा चे पती उपनगराध्यक्ष विठ्ठल कुडमुलवार यांनी गायकवाड यांना अरेरावीच्या भाषेत शिविगाळ करुन बघुन घेण्याची धमकी दिली.याचा बिलोली तालुका पत्रकाराच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करत उप विभागिय अधिकारी बिलोली यांना निवेदन देवुन पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत तात्काळ कुडमुलवार यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात यांवा अन्यथा पत्रकारा कडून तिव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येणार असुन त्याला प्रशासनच जबाबदार असणार असल्याचे कळवुन त्याची एक प्रत तहसिलदार बिलोली,पोलीस ठाणे बिलोली,पोलीस ठाणे कुंडलवाडी यांना देण्यात आल्या आहेत.या निवेदणावर मराठी पत्रकार परिषेदेचे अध्यक्ष दादाराव इंगळे , कार्याध्यक्ष रत्नाकर जाधव , प्रकाश पोवाडे , विठ्ठल चंदनकर , अशोक दगडे , शेख सुलेमान बाबुराव इंगळे , वलियोदिन फारुकी , शेख फारुख अहेमद राजु पा.शिंपाळकर , ईलियास शेख , ए.जी.कुरेशी , हर्ष कुंडलवाडीकर , संदिप गायकवाड , सतिश बळवंतकर , शेख युनुस , जयवर्धन भोसीकर , दिलीप घाटे , बस्वराज वाघमारे , सुनिल जठाळकर , प्रल्हाद भंडारे , बसवंत मुंडकर सह आदी पत्रकाराच्या स्वाक्ष-या आहेत.

112 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close