Home रायगड गौरमाता सामाजिक विकास जनकल्याण समितीचे वतीने निर्जुतक फवारणी व मास्कचे वाटप

गौरमाता सामाजिक विकास जनकल्याण समितीचे वतीने निर्जुतक फवारणी व मास्कचे वाटप

95

कर्जत – जयेश जाधव

देशात कोरोना आजारांचा प्रादुर्भाव वाढला असताना या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी ठिकठिकाणी जनजागृती व आरोग्य निरोगी राहण्यासाठी उपाययोजना व्हावी यासाठी म्हणुन गौरमाता सामाजिक विकास व जनकल्याण समितीचे वतीने गौरकामत ग्रामपंचायतीच्या परिसरातील गावात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली.

यावेळी अध्यक्ष अॅड योगेश देशमुख समितीचे सदस्य शिवशाहीर गणेश ताम्हाणे,अमोल भोपतराव, किरण थोरवे,कल्पेश शिंदे, कल्पेश गुरव,वामन भोईर, मनोहर जाधव यांचे सर्वांचे योगदान लाभले तसेच सोबत यावेळी ग्रुप ग्रामपंचायत गौरकामथ सदस्य आणि सर्व ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले याशिवाय याआधी ग्रुप ग्रामपंचायत गौरकामथच्या वतीने गाव परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी केली असल्याची माहिती अध्यक्ष अॅड योगेश देशमुख यांनी दिली.
गौरमाता सामाजिक जनकल्याण समिती गौरकामथ यांचे वतीने मौजे जंभिवली व गौरकामथ येथे मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी समितीचे सदस्य लाडके शाहीर गणेश ताम्हाणे यांनी स्वरचित गीत गात कोरोना ह्या रोगा संदर्भात जनजागृती केली याप्रसंगी गौरकामथ ग्रुप ग्रामपंचायत सदस्य,गौरमाता सामाजिक विकास व जनकल्याण समितीचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते