ताज्या घडामोडी

बातमी का छापली म्हणून पत्रकारास धमकी दिल्याप्रकरणी कुंडलवाडी नगर परिषदेच्या उपाध्यक्षावर गुन्हा दाखल….!!

● पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी पत्रकारांचे शिष्टमंडळ आज जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेणार

● जिल्हाभरातील पत्रकारांकडून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध……

बिलोली शहरातील पञकार बांधवानी तहसिलदार साहेबाबाना निवेदण देवुन नगराध्यक्ष कुडमुलवार याचा तीव्रशब्दात निषेध केला.

संजयकुमार बिलोलीकर

बिलोली , दि. १८ :- तालुक्यातील कुंडलवाडी शहरातील नगरपरिषदेच्या ई-निविदा प्रकरणाची बातमी वर्तमानपत्रात का छापली? असे म्हणत पत्रकारास अरेरावीची भाषा वापरत धमकी दिल्याप्रकरणी कुंडलवाडी नगरपरिषदेचे *उपाध्यक्ष विठ्ठल कुडमुलवार* याच्यावर भाग्यनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुंडलवाडी नगर परिषदेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. नगरपरिषदेत नगरोत्थान व अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत ४ कोटी ५५ लाख रुपयांच्या निविदा नगर परिषदेने नियमबाह्य पद्धतीने मंजुरी दिल्याप्रकरणी सत्ताधारी भाजपचे नगरसेवक सुरेश कोंडावार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार दिली होती. ह्या निवेदनाची बातमी ‘ दै. मराठवाडा केसरी’ वर्तमानपत्रात दि.१४ नोव्हेंबर रोजी प्रकाशित झाली. यानंतर या बातमीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र काढून कुंडलवाडी मुख्याधिकार्‍यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. या चौकशी आदेशाची बातमी दि.१७ नोव्हेंबरच्या ‘दै. मराठवाडा केसरी’ या वर्तमानपत्रात ” नियमबाह्य ई निविदा प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश” या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित झाले होते. ही बातमी प्रकाशित होतात कुंडलवाडी नपचे उपाध्यक्ष विठ्ठल कुडमुलवार यांचे पित्त खवळले. आणि या बातमीचा राग मनात धरून दि.१७ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता दैनिक मराठवाडा केसरी चे जिल्हा प्रतिनिधी महेंद्र गायकवाड यांना फोन करून बातमी का छापली अशा मोठ्या आवाजात जाब विचारत, तू छापायला किती पैसे घेतलेत, तुझ्यात हिम्मत असेल तर कुंडलवाडी नगर परिषदेत उद्याला ये अशी धमकीवजा शब्द वापरून दमदाटी करून अरेरावीची भाषा केली. याप्रकरणी पत्रकार महेंद्र गायकवाड यांनी भाग्यनगर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून उपाध्यक्ष विठ्ठल कुडमुलवार याच्यावर कलम ५०६,५०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण हे करीत आहेत.

◆ पत्रकारास बातमी छापली का छापली म्हणून अरेरावीची भाषा करीत धमकी दिल्याप्रकरणी राज्यात व नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात या प्रकरणाचा तहसीलदार यांना निवेदन देऊन विविध पत्रकार संघटना कडून तीव्र शब्दात निषेध करण्यात आला असून विठ्ठल कुडमुलवार यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे.

◆ विठ्ठल कुडमुलवार याच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल व्हावा यासाठी जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटनेचे शिष्टमंडळ दि.१९ नोव्हेंबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेण्यात येणार आहे.
◆ पत्रकांरावर दिवसेंदिवस लोकप्रतिनिधींकडून बातम्या का छापल्या असे म्हणत दादागिरी व अरेरावी भाषा वापरतात जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याजात असल्याच्या प्रकारात वाढ होत असल्याने पत्रकारात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तीच्या लोकांना पायबंद घालण्यासाठी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी पत्रकारांतुन होत आहे.

117 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close