लोणार येथे गोवंश हत्या…..!

गाय वासरू ची चोरी करून कत्तल…
गुन्हा दाखल , ” दोन आरोपींना अटक “
बुलडाणा , दि. १९ :- लोणार मेहकर रोड वरील एका शेतातील गोठ्यातुन रात्री गाय , बैल , वासरू यांची चोरी करून कत्तल करण्यात आली आहे या प्रकरणी शेतकऱ्याच्या तक्रारी वरून गाय वासरू च्या चमड्या सह दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे या मुळे शहरात खळबळ उडाली आहे .
या संदर्भात पोलीस विभागा कडून मिळालेल्या माहिती नुसार येथील रहिवाशी गजानन मापारी यांची मेहकर रोड वर राजमळा परिसरात शेती व गोठा आहे या गोठ्यात गाय , म्हेस , बैल , वासरू होते आज सकाळी गजानन मापारी यांचे भाऊ दूध काढण्या साठी गोठ्यात गेले असता त्यांना एक बैल , गाय , वासरू दिसून आले नाही त्यांनी शहेरात येऊन शोध घेतला असता येथील आझाद नगर परिसरात त्यांना त्यांच्या गाय वासरू चे चमडे दिसून आले या वरून त्यांनी आझाद नगर येथील शेख मुद्स्सीर शेख बासेद यांना विचारणा केली असता त्याने कबुली दिली की मी व माझे सहकारी शेख बाबू मिया शेख लाल रा , आझाद नगर दोघांनी मिळून एक बैल 30 हजार एक गाय बिस हजार , वासरू पंधरा हजार रुपये चोरले आहे आरोपींनी या पैकी गाय आणि वासरू ची कत्तल करून मास विक्री केली आहे शेतकऱ्याचे 65 हजार चे नुकसान झाले आहे या प्रकरणी गजानन मापारी यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी दोघा आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून या घटनेचा तपास ठाणेदार माळी यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार सुरेश काळे हे करीत आहे .