बुलढाणा

चिखली येथील भावी इंजिनियर ची आत्महत्या

अमीन शाह

बुलडाणा , दि. २१ :- बी.इ अभ्यासक्रमाला द्वितीय वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. चिखली-जालना रोडवरील अंचरवाडी फाट्याजवळ एका झुडपात गळफास घेतलेल्या स्थितीत या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला.

उमेद अंभोरे (वय, 20) असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. उमेद हा चिखली येथील शिक्षक कॉलनीत कुटुंबासोबत राहत होता. अनुराधा इंजिनिअरिंग महाविद्यालयात बी.इ अभ्यासक्रमात तो द्वितीय वर्षात शिकत होता. उमेद हा मागील तीन दिवसांपासून घरातील कोणालाही न सांगता निघून गेला होता. सोबत स्कुटी देखील घेवून गेला होता. उमेद हा तीन दिवसापासून बेपत्ता असल्याने कुटुंबीयांनी शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर चिखली-जालना रोडवरील अंचरवाडी फाट्याजवळ उमेदचा मृतदेह एका झुडपाला लटकलेल्या स्थितीत आढळला. त्यामुळे परिसरात खळबळ उडली. उमेदच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळाले नाही. अंढेरा पोलीस पुढली तपास करित आहे.

33 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close