उ. महाराष्ट्र

स्वतंत्र सेनानी टिपू सुल्तान जयंती उत्साहाने साजरी टिपू सुल्तान प्रेमींकडून शासकीय रुग्णालयात फळ वाटप

रावेर – शरीफ शेख

जळगांव , दि. २१ :- स्वतंत्र लढ्यात ज्यांचा मोठा योगदान होता अशे मैसूर चे शासक शहिद ए वतन टिपू सुल्तान यांची २७० वी जयंती बोदवड शहरातील टिपू सुल्तान प्रेमींनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सामाजिक उपक्रम राबवून जयंती साजरी केली. बोदवड येथील टिपू सुल्तान प्रेमींनी मोठ्या उत्साहात टिपू सुल्तान जयंती साजरी केली. जयंती निमित्ताने बोदवड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी असलेल्या रुग्णांना फळ वाटप करून टिपू सुल्तान प्रेमींनी रुग्णांचे हाल जाणून घेतले.
शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, परिचारिका, यांची उत्तम कामगिरी पाहता त्यांचा गौरव करण्यात आला. व शासकीय रुग्णालयाची पाहणी करून रुग्णालयात उपचारासाठी बंद पडलेली अंबुलेन्स सेवा सुरू करण्यात यावी यानिमित्ताने तेथील कर्मचाऱ्यांशी टिपू सुल्तान प्रेमींनी संवाद साधला.
त्यानिमित्ताने फळ वाटप करतांना कलीम शेख, आसिफ बागवान, नईम खान,समीर पिंजारी,लुकमान पिंजारी, अय्युब कुरेशी, हर्षल बडगुजर,गजानन खोडके, समीर शेख, अनवर कुरेशी,जाकीर शेख, सद्दाम कुरेशी आदी उपस्थीत होते.

25 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close