अकोला

आकोटात विज कामगार मेळावा व काँ. रजा अली यांचा कार्यगौरव

कुशल भगत

अकोट , दि. २१ :- स्थानिक मंगल कार्यालय सभागृह महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियन अकोट विभागाच्यावतीने १७ नोव्हेंबर रोजी भव्य वीज कामगार मेळावा पार पडला या मेळाव्याला राज्यभरातून युनियनचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते त्यांनी वीज कामगारांचे प्रश्न समस्या व त्यावर उपाय योजना व मार्गदर्शन केले कार्यक्रमांतर्गत अकोट येथील काँ. रजा अली मोहम्मद अली यांचा सेवानिवृत्ती पर कार्य गौरव सोहळा पार पडला या मेळाव्याला मोठ्या संख्येने वीज कामगार उपस्थित होते या मेळाव्याचे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी म.रा.स्वाभिमानी विघुत वर्कर्स युनियन चे अध्यक्ष काँ.पी. बी. उके ,उद्घाटक कॉ. टि. एम. गवळी केंद्रीय कार्यकारणी सदस्य ,तर राज्य उपाध्यक्ष काँ. एस. एम. खोले ,सरचिटणीस काँ.राजेश कटाळे ,अतिसरचिटणीस कॉ. इकबाल खान ,उपसरचिटणीस कॉ. विवेक महाले , उपसरचिटणीस कॉ. सुनील देशमुख ,संयुक्त सचिव कॉ. सतीश जायले, संयुक्त सचिव कॉ. प्रमोद लोडम,संयुक्त सचिव कॉ. एस. गोरे,केद्रीय कार्यकरणी सदस्य कॉ. सुरेश कोल्हे ,जेष्ठमार्गदर्शक कॉ.ए. ए. टोलमारे ,जेष्ठमार्गदर्शक कॉ. आर. एम. हिरपुरकर,झोन सचिव कॉ.विलास भारती,झोनल अध्यक्ष कॉ. सी. भवाणे,झोनल संघटक कॉ .एस .जे.जयस्वाल ,सर्कल अध्यक्ष कॉ. एस. डफळे ,सर्कल सचिव कॉ. एस. बी. निकामे प्रमुख अतिथी उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी महावितरण वीज वितरण कंपनी मर्या. कार्य करत असताना वीज कामगारांना येणाऱ्या अडीअडचणी समस्या वीज कामगारांचे प्रश्न आदी विषयावर प्रकाश टाकलात उपाय सुचविले तसेच कामगारांचे स्व:ता हितासोबतच कंपनीचे हीत प्रथम जोपासावे असा उपद्देश सुद्धा केला. महावितरण कंपनीमधे चाळीस वर्ष कर्तव्यनिष्ठ पणे सेवा बजावणाऱ्या काँ.रजा अली मोहम्मद अली यांचा मान्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियन च्या वतीने त्यांना दुचाकी सप्रेम भेट देण्यात आली .

काँ. रजा अली यांनी संघटने मध्ये विभागीय संघटक म्हणून केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन कॉ. किरण पवार विभागीय सचिव,राज्यउपाध्यक्ष कॉ. एस.एम खोले ,प्रास्ताविक झोनसचिव कॉ. विलास भारती, आभार प्रदर्शन कॉ.योगेश वाकोडे यांनी केले या मेळाव्यापूर्वी देशभक्तिपर संगीत रजनी कार्यक्रम पार पडला यामध्ये स्थानिक अकोट कलामंचाच्या कलावंतांनी सहभाग नोंदवला कार्यक्रमस्थळी भव्य एलईडी वॉल वर काँ.रजा अली यांचा जीवनपट, विज कामगारांचे कार्य, अपघात टाळण्याचे उपाय आधी चलचित्रे दाखविण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी युनियन अकोट विभाग चे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

19 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close