ताज्या घडामोडी

जि.प.शाळा मायणी मुले येथे मुलांचे हक्क व सुरक्षिता बाबत जाणीव जागृती उपक्रम सप्ताह साजरा

मायणी ता.खटाव जि.सातारा , दि. २१ :- (सतीश डोंगरे) दिनांक 14 ते 23 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणारा जाणीव जागृती उपक्रम सप्ताह निमित्त बाल दिनानिमित्त दप्तर विना शाळा उपक्रम राबविण्यात आला यामध्ये मुलांचे आनंददायी खेळ घेण्यात आले मुलांनी शाळेत पणत्या आकाशकंदील तयार केले किल्ले रचले व दिनांक 20 नोव्हेंबर दिवशी वेषभूषा दिवस साजरा करण्यात आला या स्पर्धेत इयत्ता पहिली ते चौथी सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतला या वेशभूषेत छत्रपती शिवराय मावळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे संरक्षण करणारे सैनिक देशाचा पोशिंदा शेतकरी शिक्षक पंडित नेहरू वारकरी अशा विविध भूमिका बाल

चिमुकल्यांनी सादर केल्या स्वतःचे मनोगत व्यक्त केले केले या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वडगावकर मॅडम व इतर सर्व शिक्षक ल देशपांडे मॅडम मॅडम कालेकर मॅडम सनगर मॅडम निकम मॅडम कांबळे मॅडम व श्री जगताप सर या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमात मुले व पालकांना उत्स्फूर्त प्रतिसाद प्रतिसाद दिला व कार्यक्रमाचा आनंद घेतला.

55 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close