ताज्या घडामोडी

स्नॅपडिल ऑनलाईन कंपनीमध्ये गैरकायदेशीर शस्त्रे विक्रीची जाहीरात प्रसिध्द…..!

कारवाई करण्याबाबत युथ काँग्रेसच्या सदस्यांचे पोलीस अधिक्षकांना निवेदन…

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

यवतमाळ , दि. २१ :- फेसबुक अंकाऊंट वापरतांना स्नॅपडिल या ऑनलाईन कंपनी व्दारे काही गैरकायदेशीर शस्त्रांची यादी जाहीरात प्रसीध्द करण्यात आल्याबाबत येथील युथ काँग्रेसच्या सदस्यांनी जाहीरातीवर बंदी आणून स्नॅपडिल ऑनलाईन कंपनीवर कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन पोलीस अधिक्षकांना आज देण्यात आले.
फेसबूक अंकाऊंट वापरतांना स्नॅपडिल या ऑनलाईन कंपनी व्दारे काही गैरकायदेशीर शस्त्रांची यादी जाहीरात जसे मॉडेल नं.आरई-१ शस्त्राची विस्तृत माहिती रुस्तम, स्मुथ, कीन्फ लांबी २२ से.मी.किंमत रुपये ८७९/- ची जाहीरात सुरु आहे. हे शस्त्र जवळपास ९ इंचाचे आहे. अशा घातक शस्त्राची जाहीरात आणि ते एवढे सहज उपलब्ध होणे ही गंभीर बाब आहे. एवढे सहज शस्त्र उपलब्ध झाल्याने ते ठेवण्यासंबंधी आवड लहान किशोरवयीन मुलांमध्ये वाढत आहे. यवतमाळ शहर गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्रात क्रमांक १ वर असतांना कंपनीने ३० दिवसात एवढे घातक शस्त्र १ हजार १०४ एवढ्या मोठया संख्येत ऑनलाईन विकलेले आहे.

यावरुन याप्रकरणाची गंभीरता ओळखता येते. विशेष बाब म्हणजे कंपनी हे शस्त्र विकतांना कुणाला, कशासाठी हे प्रश्न न विचारता फक्त व्यवसायीक दृष्टीकोन समोर ठेवून विक्रीवर भर देत असते. याबाबत जहीरातीवर बंदी आणण्यासाठी व संबंधीत कंपनी विरोधात त्वरीत कायदेशीर कार्यवाही करण्यात येवून यानंतर असे घातक शस्त्राची जाहीरात प्रसिध्द न करण्याबाबत ताकीद देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन युथ काँग्रेस, यवतमाळ कडून पोलीस अधिक्षकांना देण्यात आले. यावेळी ललीत जैन, मयुर देसाई, लालाजी तेलगिरे, दत्ता हाळके, राजीक पटेल, समीर शेख, भुषण वासेकर, धिरज मोरे, संकल्प तसरे आदींची उपस्थिती होती.

69 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close