विदर्भ

परतोडा येथे संविधान दिन साजरा.!

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. २८ :- महाराष्ट्र शासणाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था (बार्टी)पुणे यांचे महासंचालक कैलास कणसे ,समतादूत प्रकल्पाच्या मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे यांच्या आदेशानुसार व प्रकल्प संचालक नागपूर विभाग मिलिंद माने तसेच प्रकल्प अधिकारी दिनेश बारई यांच्या मार्गदर्शनाखाली समतादूत सिध्दार्थ सोमकुवर विनायक भांगे व बंश्री परतेती यांनी संविधान दिनाचे औचित्य साधून आर्वी तालुक्यातील जळगांव ग्राम पंच्यायमध्ये येणाऱ्या परतोडा गावात संविधान साक्षर ग्राम उपक्रमाला संविधान दिन साजरा करून सुरुवात करण्यात आली.

संविधान चिरायू होवो , जय भारत जय संविधान अश्या घोषणा देत आज २६ नोव्हेंबर २०१९ ला सकाळी 10 वा. संविधान च्या ७० व्या वर्द्यापण दीन निमित्त परतोडा बुद्ध विहार परीसर येथे संविधान साक्षर ग्राम मोठ्या उत्साहात शैलीत साजरा करन्यात आला या संविधान ग्राम जन जागृती प्रचार प्रसार रॅली व संविधान पालखी जी प शाळा परिसर येथून निघाली या रॅलीत अंगणवाडी कर्मचारी,महिला बचत गट , शाळेतील शिक्षक ,युवा, विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी,तसेच आशा वर्कर,गावातील सर्व सन्मानित नागरिक उपस्थित होते. समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ सोनालीताई मंगेशजी लोढे सरपंच जळगाव या तर कार्यक्रमाचे उदघाटन सौ दिपालिताई नंदकिशोर डोंगरे पंचायत समिती सदस्या यांनी केले तर मार्गदर्शक म्हणून मा हादवे सर तालुका व्यवस्थापक उमेद व सौ सुजाता लोहकरे म्याडम मावीम आर्वी या उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार बंधू राजूभाऊ खंडारे,सौ संगीता अशोकराव डोंगरे ग्रा प सदस्य,श्री दिनानाथ यादव ग्रा प सदस्य ,गावाचे प्रतिष्टीत नागरिक श्रावणजी तिखाडे ,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुरेश अरसड सहाययक शिक्षक ज्ञानेश्वर सावरकर ,नरेंद्र मुडे, संतोष डोंगरे व अशोकराव पांडेकर हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समतादूत सिध्दार्थ सोमकुवर यांनी केले प्रास्ताविक विनायक भांगे यांनी तर आभार बंश्री परतेरी यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वी होण्यासाठी सौ जोत्सना ताई तिखाडे सह गावातील युवक, महिला बचत गट व ग्रामस्तानी परिश्रम घेतले. समतादूत प्रकल्प द्वारे हाती घेतलेल्या या बार्टी च्या अभिनव व नावीन्यपूर्ण उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.100 टक्के संविधान साक्षरता व्हावी व संविधान घरोघरी पोहचावे व समाजातील सर्व नागरिकांना मूलभूत अधिकार कळावे , संविधानातील मूलतत्वे, ग्राम स्वच्छता अभियान,अंधश्रद्धा निर्मुलन व वैद्न्यानिक दृष्टीकोण इत्यादी कार्यक्रम या संविधान साक्षर ग्राम उपक्रमात राबविण्यात येणार आहे .

22 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close