गुन्हेगारी

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना २४ तासात अटक

टोळी विरोधी पथकाची कारवाई…!

रवि माळवी

यवतमाळ , दि. २९ :- जुन्या वादाचे कारणावरुन आरोपींनी ईसमाचा खून केल्याची घटना दिनांक २७ नोव्हेंबर रोजी बाभूळगाव येथे घडली होती. टोळी विरोधी पथकाने याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून एक अरोपी हा फरार अाहे.
देविदास शंकर वादाफळे रा.सुकळी असे मृतकचे नाव अहे. जिल्हा पोलीस अािक्षक एम.राज कुमार सो.प्रभार पोलीस अधीक्ष नुरुल हसन सो. यवतमाळ उपवभागाच्या पोलीस उपअधिक्षक, श्रीमती माधुरी बावीस्कर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदिप शिरस्कर यांचे नेतृतवात टोळी विरोधी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलन कोयल व पथकातील सहाय्यक फौजदार ऋषीकुमार ठाकुर, संजय दुबे, योगेश गटलेवार, गणेश देवतळे, अमोल चौधरी, जयंता शेंडे, प्रतिक्षा केने यांनी दिनांक २७ नोव्हेंबर रोजी बाभुळगांव पोलीस स्टेशन येथील अप.क्र.५४४/१९ भादंवि कलम ३०२ दाखल गुन्ह्याचे घटणास्थळी भेट देवून तपासाची वेगवान चक्रे फिरवून मिळालेल्या गोपणीय माहीती अन्वये तसेच घटनास्थळी केलेले निरीक्षण, साक्षीदारांकडे केलेल्या तोंडी चौकशी व माहीतीचे आधार गावातील राहणारे ईसम विकास मनोहर नंदपटेल यांचे व मृतक देविदास शंकर वादाफळे यांचेमध्ये असलेल्या जुन्या वादाचे कारणावरुन विकास नंदपटेल यांचे मनात खून राग होता. या रागातून हा खून करण्यात आला होता. आरोपी विकास मनोहर नंदपटेल रा.सुकळी ता.बाभुळगाव व त्याचे साथीदार प्रमोद डोमा शंकर शिंदे रा. गिमोना ता.बाभुळगांव यांचा शोध घेतला असता ते मिळून आले. पोलीसांनी त्यांना विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्यांनी ते अपराधाचे वेळी सोबत असल्याची हकीकत सांगीतली. त्यांनी गुन्हा का व कशा प्रकारे केला याबाबत माहीती दिली. त्यांचे सोबत असलेला तीसरा आरोपी साथीदार निखील सिध्देश्वर तोडसाम रा.नांदुरा डफरे ता.देवळी जि.वर्धा हा मिळून आला नाही त्याचा शोध घेणे सुरु आहे. आरोपी विकास नंदपटेल व प्रमोद , डोमा शिंदे यांना अटक केली असून पुढील कार्यवाही करीता बाभुळगांव पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक सतिष जाधव यांचेकडे सुपूर्त केले आहे.

84 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close