विदर्भ

आईचा मृतदेह बघताच मुलीनेही घेतला जगाचा निरोप

सौ. पदमाताई प्रभाकर मुंजेवार

आई पाठोपाठ मुलीचाही मृत्यू…

वर्धा , दि. ३० :- जिल्ह्यातील सेलू तालुक्यात
काल मृत्यू पावलेल्या आईच्या अंत्ययात्रेसाठी आलेल्या मुलीने आईचा मृतदेह बघताच धसक्याने जगाचा निरोप घेतला, ही घटना (ता. 29) सेलू येथे घडली , या घटनेमुळे कांबळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
मनोरमा कुशाबराव कांबळे वय 75 प्रभाग क्र.15 सेलू यांचे (ता. 28) काल अचानक निधन झाले. त्यांच्या मृत्यूचा सर्व नातेवाईकांना निरोप देण्यात आला होता. ता. 29 शुक्रवारला अंत्यसंस्कार करण्यात येणार होता. त्यासाठी सर्वच नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी आले होते. मृतक मनोरमा कांबळे यांची मुलगी शालिनी अरविंद साळवे वय 50 रा.कर्नलबाग नागपूर येथे राहतात.काल आईचा मृत्यू झाल्यामुळे आज असलेल्या अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी मुलगी सेलू येथे आली होती.मुलीने येथे येताच टाहो फोडला आणि मृतदेहाजवळ जाताच त्यांना हृदयविकाराचा जोरदार धक्का बसून आईच्या मृतदेहाशेजारीच त्यांचाही मृत्यू झाला .

या घटनेमुळे नातेवाईकांत एकच तारांबळ उडाली. आईचा अंत्यसंस्कार थांबवून मुलीचा मृतदेह नागपूर येथे पाठविण्यात आला, आणि आईचा अंत्यसंस्कार पार पडला .उद्या मुलीवर नागपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे , या घटनेमुळे कांबळे कुटुंबियावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

26 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close