जळगाव

ऐनपूर महाविद्यालयात राज्यस्तरीय केळी परिषद संपन्न , केळी चे उत्पादन शास्त्रोक्त पध्दतीने घेणे गरजेचे –  वंसतराव महाजन

शरीफ शेख

रावेर , दि. ०१ :- निंभोरा बुद्रुक ता.रावेर येथून जवळचऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात दि.२९ नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय भाषिक अल्पसंख्याक केळी उत्पादक शेतकरी परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या प्रसंगी बिजभाषणात केळी ही पारंपारिक पध्दतीने न लावता शास्त्रोक्त पध्दतीने लावणे गरजेचे जेनेकरून उत्पादनात वाढ करता येईल असे मत चिनावल येथिल कृषी तज्ञ वसंतराव महाजन यांनी व्यक्त केले.

प्रमुख अतिथी मकरंदभाई पटेल यांनी जळगाव जिल्हा हा केळीसाठी प्रसिद्ध असून नविन प्रयोगाद्वारे जास्त उत्पादन करण्यासाठी केळी परिषदेची आवश्यकता आहे. असे मत व्यक्त करून नविन पध्दतींचा अवलंब करण्याचा सल्लादिला. त्याच बरोबर सर्वात आधी माती व पाणी परिक्षण करणे गरजेचे असून त्या नुसार पिक घेतले तर कमी खर्चात मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाऊ शकते असे मत शहादा येथिल के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयातील प्रा.पी.वाय पेंढारकर यांनी व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष भागवत पाटील हे होते त्यांनी मनोगतात शेतकरी खुप मोठ्या संकटात सापडला आहे त्याला संकटातून सोडवणे गरजेचे असल्याने ही परिषद अत्यंत महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगीतले. या वेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डाँ.जे.बी.अंजने यांनी केले त्यांनी काँलेजला मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनची मुले असल्याचे नमुद करत महाविद्यालयीन शिक्षणासोबत शेतीविषयक ज्ञान असणे गरजेचे असल्याने केळी परिषदेचे आयोजन हे महत्वाचे आहे असे सांगून महाविद्यालयाची व परिषदेची माहीती दिली. तसेच केळी परिषदेची प्रस्थावना संस्थेचे सदस्य विकास महाजन यांनी मांडली.
या वेळी व्यासपीठावर चोपडा येथिल चहार्डी साखर कारखाण्याचे माजी चेअरमन डॉ. सुरेश शामराव पाटील, फार्मसी काँलेज शहादा चे प्राचार्य डॉ.एस.पी पवार, शहादा चे राजेंद्र पाटील, माजी शिक्षण अधिकारी जी.एन.पाटील शहादा, योगेश पाटील शहादा, केऱ्हाळा येथिल सुधाकर पाटील, हरी पाटील, वाघोदा हायस्कूल चे चेअरमन डी.के.महाजन, माजी जि.प सदस्य व बा.ना.पाटील बलवाडी विद्यालयाचे चेअरमन विनोद पाटील, बलवाडी येथिल निंभोरा फ्रुटसेल सोसायटीचे माजी मँनेजर रघुनाथ महाजन, बा.ना.पाटील विद्यालयाचे सेक्रेटरी गोपाल पाटील, संस्थेचे सचिव संजय महाजन, चेअरमन श्रीराम पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी संस्थेचे सर्व संचालक परिसरातील शेतकरी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्यासंख्येने उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन परिषदेचे समन्वयक डॉ.के.जी कोल्हे यांनी केले तर आभार डॉ. एस.ए.पाटील यांनी मानले.परिषदेस १३५ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.संस्थेच्या वतीने संचालक एन व्ही पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.सदर राज्य स्तरीय केळी परिषदेचे आयोजन केळी असल्यास व संशोधन केंद्रामार्फत करण्यात आले होते.

28 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close