वर्धा

खरांगणा मोरांगणा स्थानिकांना डावलून बाहेरच्या उमेदवारांना कामावर घेण्याच्या विरोधात कामगारांनी ईगल कंपनी च्या असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर ला दिला चोप.

सौ. पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. ०१ :- खरागणा मोरांगणा येथील स्थानिकांना डावलून बाहेरच्या उमेदवारांना कामावर घेण्याचा विरोधात कामगारांनी ईगल कंपनीच्या असिस्टंट मॅनेजरला चोप
दिल्याने कंपनी परिसरात काहीवेळ तणावाची स्थिती निर्माण झाली परंतु पोलिसांनी घटनास्थळी जाऊन कामगारांची समजूत काढल्याने परिस्थिती आटोक्यात आली. ही घटना तारीख ३० ला दुपारी तरोडा येथे घडली सविस्तर वृत्त असे की पिंपळखुटा ते रोहणा खरांगणा ते कोंढाळी रस्त्याचे काम इगल नामक कंपनीने घेतली असून सदर कंपनीचे कार्यालय तरोडा येथे आहे सुमारे एक वर्षापासून परिसरा तील बेरोजगार युवक कंपनीतील वेगवेगळ्या वाहनांवर चालक म्हणून तर काही इतरत्र कामावर नियमित असताना असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर चंद्रकांत स्वामी यांनी स्थानिक उमेदवारांना असेल भाषेत शिव्या दिल्याने युवकांचा आत्मसन्मान दुखावला गेला त्यांनी आंदोलनाचे शस्त्र उघडताच त्यांना कामावरून कमी करून बाहेर जिल्ह्यातील उमेदवारांना कामावर घेण्याचा प्रयत्न केल्याने धक्काबुक्की झाली प्रकरण पोलिसात गेल्याने सदर प्रकरणाची माहिती भाजपाचे नेते राजू राठी तसेच शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख निलेश देशमुख ख् यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधितांना परिस्थितीबाबत अवगत केले अनेकांवर अन्याय सहन करणार नाही त्यांना त्वरित न्याय देण्याची मागणी केली तसेच स्थानिकांनाच कामावर घ्या बाहेर जिल्ह्यातील व्यक्तींना कामावर घेऊन उपरोक्त तरुणांना डावलल्या स उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला.

23 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close