मराठवाडा

डॉ. प्रियंका रेडी बलात्कार प्रकरणातील आरोपीना जाहीर फाशी द्या – माहूरच्या महिला बचत गटाची मागणी…!!

मजहर शेख

नांदेड / माहूर , दि. ०२ :- हैद्राबाद येथील डॉ. प्रियंका रेड्डी या महिलेचा बलात्कार करून निर्घृण हत्या केल्या प्रकरणाचे माहूर तालुक्यात तीव्र पडसाद उमटले असून समाजाच्या सर्व स्तरातून या अमानुष घटनेचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे. माहूर माहूर येथे संतोषीमाता महिला बचत गट व माहूर तालुक्यातील समस्त महिला बचत गटाच्या वतीने आज शहरातील टी पॉइंट दत्त चौक येथे निषेध सभेचे आयोजन केले होते यावेळी पीडित महिला डॉक्टर प्रियंका रेड्डी हिस मेणबत्त्या प्रज्वलित करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. व सदरील सदरील प्रकरण फास्टट्रॅक चालवा व सदरील अमानुष कृत्य करणाऱ्या नराधमांना जाहीर फाशी द्या अशी मागणी महिला बचत गटांच्या संतप्त महिलांनी केली. यावेळी उपनगराध्यक्ष सौ.अश्विनीताई तुपदा सौ.जयश्री चव्हाण,
नगरसेविका सौ वनिता ताई जोगदंड पाटील, सौ कल्पनाताई येवतीकर, सौ रेणुका दीक्षित, वैजयंता जाधव, सौ राधा उपलेंचवार, लहाने मॅडम, किरण फड, डॉ. सुषमा चौधरी आंबेकर, सौ.मयुरी तिडके सौ.मीनाक्षी पाटील, शितल केदार, कु. वेदिकाताई अडकिने, दीपा सावळकर, सुषमा ठाकूर, सौ. अश्विनी महामुने, अशा राठोड आदीसह माहूर शहर व तालुक्यातील अनेक महिला बचत गटाच्या पदाधिकारी व सदस्य महिला शहर व तालुक्यातील विविध कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी सौ कृतिका वरणगावकर, नगरध्यक्षा कु.शितल जाधव, जेष्ठ पत्रकार नंदू संतान, स.पो.नि.भालचंद्र तिडके, पत्रकार जयकुमार अडकिने,काँग्रेस शहराध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे, डॉ.सुप्रिया गावंडे पद्मजा गिऱ्हे, यांनी आपले मनोगत व्यक्त करून आपल्या तीव्र संतप्त भावना व्यक्त केल्या.यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके, नगरसेवक इलियास बावानी, भाजप तालुकाध्यक्ष देवकुमार पाटील, तालुका क्रिडा संयोजक डी. डी. चव्हाण, जयकुमार अडकिने, डॉ.रमेश गावंडे पाटील, पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष एस.एस.पाटील, अब्दुल हक सौदागर, स्वच्छतादूत गणेश जाधव, डॉ.अभिजित आंबेकर, स्वच्छता दूत गणेश जाधव, साईनाथ नागरगोजे, मनोज बारसागडे, पत्रकार राज ठाकूर, यश ठाकूर आदीसह बहुतांश नागरिक उपस्थित होते.

38 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close