जळगाव

डॉक्टर प्रियंका रेड्डी यांच्यावर पाशवी अत्याचार करणाऱ्या व निर्गुण हत्याकांडाचा त्रिवार निषेध…

शरीफ शेख

रावेर , दि. ०२ :- जळगाव शहरातील जागरूक मुस्लिम मंच तर्फे शहरातील सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील समाजातील कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन माननीय मुख्यमंत्री तेलंगणा राज्य तसेच माननीय अमित शहा केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार यांना प्रभारी जिल्हाधिकारी डॉक्टर बेडसे यांच्यामार्फत निवेदन देऊन एकूण पाच मागण्या केलेल्या आहेत त्यात प्रामुख्याने
१) डॉक्टर प्रियंका रेड्डी यांच्यावर पाशवी अत्याचार करून तिचा निरघुन हत्याकंडास जबाबदार असणाऱ्यांना नराधमांना तात्काळ कठोर शासन करावे, घटनास्थळावर जाण्यासाठी दिरंगाई करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी, समाजात कायदा व सुव्यवस्थेचे बाबत समाजकंटकांना दहशत वाटावी व सर्वसामान्यांना विश्वास निर्माण व्हावा म्हणून सदर प्रकरण अतिजलद न्यायालयात निवाडा करून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, देशभरातील महिलांमध्ये सुरक्षेतिची भावना निर्माण होण्यासाठी कठोर कायद्याची तरतूद करावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या.

तत्पूर्वी या मुस्लिम समाजाच्या वतीने सदर घटनेचा त्रीव शब्दात निषेध करण्यात आला यावेळी कुल जमातीचे सय्यद चाँद व बशीर बुरहानी, मनियार बिरादरीचे फारुक शेख, ईदगाह ट्रस्टचे अनीस शाह व ताहेर शेख, काँग्रेस पक्षाचे अमजद खान, बाबा देशमुख व जमील शेख,मीज़ान फॉउंडेशन चे कासिम उमर, जामा मशीदचे अल्ताफ शेख व रउफ टेलर, फुले मार्केट हॉकर्स समितीचे फारुख अहेलेकार, शिरसोली शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य शेख अकील, आदींचा समावेश होता.

20 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close