विदर्भ

“राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेच्या ऑनलाइन अर्जाला मुदतवाढ द्या”

निखिल सायरेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे आग्रही मागणी…!

अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता….!!
यवतमाळ , दि. ०२ :- राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेल मार्फत राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश नुकतेच आटोपले. मात्र या प्रवेशानंतर राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती (पोस्ट मॅट्रिक) करीता ऑनलाईन अर्ज सादर करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळही मिळाला नाही. शेवटच्या राऊंडमध्ये प्रवेश झालेले अनेक विद्यार्थी या शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते निखिल सायरे यांनी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेच्या ऑनलाइन अर्जाला मुदतवाढ देण्याची आग्रही मागणी मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे सादर केलेल्या निवेदनातुन केली.
नुकतेच सीईटी सेल मार्फत राबवलेल्या वेगवेगळ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश आटोपले. यावर्षी काही अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला बराच उशीर झाला. त्यामुळे सर्वात शेवटच्या टप्प्यात प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेमध्ये आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज सादर करण्यास पुरेसा वेळही मिळाला नाही. सबब राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेच्या ऑनलाईन अर्जाकरीता १५ दिवसांची अर्थात दिनांक १५ डिसेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ मिळावी, हि मागणी निखिल सायरे यांनी राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिनांक ३० नोव्हेंबर रोजी सादर केलेल्या निवेदनातून केलेली आहे.
याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांनी तातडीने दखल घेत सामाजिक न्याय विभागाचे सचिवांना आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबतचे लेखी निर्देश दिले. आता सामाजिक न्याय विभाग यावर काय कार्यवाही करते, याकडे विद्यार्थ्यांकडे लक्ष लागले आहे.
25 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close