गुन्हेगारी

पत्नीच्या जाचाला कंटाळून सैनिक पतीची गळफास लावून आत्महत्या…!

अमीन शाह

बुलडाणा , दि. ०३ :- पत्नी च्या जाचाला एखादं पती एवढा त्रस्त होतो की त्याला आपला आयुष्य सम्पवावा लागतो ही फार दुर्देवी बाब आहे सीमेवर शत्रूशी दोन हात करून त्यांना धूळ चारणार्या भारतीय वीर जवानाला मात्र आपल्या पत्नी समोर हार मानावी लागली
आखेर पत्नी च्या जाचाला कंटाळून एका सैनिकाने निंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना आज घडली धाड जवळील ग्राम इरला येथे उघडकीस आली. मृतकाचे नाव धनलाल प्रकाश खरात वय २८ वर्षे असे आहे. दरम्यान मृतकाजवळ आढळून आलेल्या चिठ्ठीत पत्नीच्या त्रासामुळे आत्महत्या करीत असल्याची माहिती नमूद असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

आत्महत्येपूर्वी मृतक सैनिकाने आपल्या एका मित्राला मोबाईलद्वारे आत्महत्या करीत असल्याचा मॅसेज पाठविल्यामुळे ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती धाड पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होवून तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे इरला गावासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सर्वत्र दुःख वयक्त केले जात आहे.

160 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close