ताज्या घडामोडी

शासन सेवेत कार्यरत डॉक्टरांचा खाजगी वैद्यक व्यवसाय आघाडीवर…!!

पुरुषोत्तम कामठे

यवतमाळ , दि. ०३ :- श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ येथील अध्यापक , प्राध्यापक आणि सहा प्रध्यापक हे गेल्या कित्तेक वर्षापासून शासनाची फसवणूक करीत स्वताचे खाजगी रुग्णालय थाटून खाजगी वैद्यक व्यवसाय करीत आहे.

या बाबत कित्तेक सामाजिक कार्यकर्त्यांनी वारिष्ठांकडे तक्रारी दाखल केल्या परंतु कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाल्याचे दिसून आले नाही. या मागील कारण असे की डॉक्टरांची एकात्मता आणि आता मात्र या डॉक्टरांनी हद्द पार केली रुग्णालयात न येता आपल्या कलिकांना रुग्णांच्या रिपोर्ट जसे की , एक्सरे , रक्त तपासणीच्या रिपोर्ट व इतर काहि तपासन्याचे रिपोर्ट whtsapp च्या माध्यमातुन मागऊन फोन वर त्या रुग्णाला काय उपचार द्यायचा ते आपल्या कलिकांना सांगत असल्याचे दिसून आले. तर कित्तेक अध्यापक हे रुग्णालयात अमावस्या पोर्णिमेला उगवणाऱ्या चंद्रासारखे दिसून येतात तर काहि फक्त कागदावर हजर राहतात . या सर्व प्रकारावर प्रतिबंधक लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधीष्ठाता डॉ मनीष श्रीगिरवार यांची सर्व अध्यापकांनी एकमत होऊन वारिष्ठांकळे तक्रार दाखल करून अधिष्ठाता डॉ मनीष श्रीगिरवार यांचेवार दबाव आनला आणि त्यांचे सुद्धा हात बांधले या सर्व प्रकाराने आज ही परिस्थिति निर्माण झाली आहे. की वैद्यकीय विद्यार्थी सुद्धा खाजगी रुग्णालयात प्रैक्टिस करीत असल्याचे दिसून येत आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांचे खाजगी रुग्णालयात प्रैक्टिस करण्यामागचे कारण त्यांची आर्थिक कमाई की त्यांना या अध्यपकांच्या गैरहाजीरीमुळे पुरेपूर मिळत नसलेले शिक्षण हे अध्यापहि समजून आले नाही अशी यवतमाळ नागरीकांनमध्ये चर्चा.

112 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close