गुन्हेगारी

जन्मदाता बापच झाला हैवान…!!

झोपेची गोळी देऊन आपल्या सख्ख्या अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार , “गुन्हा दाखल”

अमीन शाह

बुलडाणा , दि. ०३ :- आपली लाडकी लेक ज्याला माय बाप लहान चा मोठा करतात,तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपतात, तिला शिकवतात, तिचे थाटात लग्न लावून देतात ,वडील आणि मुलगीच हे नातंच वेगळ असत मुलगी ही आपल्या जन्मदात्या बापाला कधीच विसरत नाही हे नातंच जगा वेगळ असत परंतु आज बाप बेटीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना आपल्या बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे, राक्षस, हैवान झालेल्या एका नराधम बापाने आपल्या पोटच्या मुलीला झोपेच्या गोळया देऊन तिच्या शरीराचे लचके तोडले आहे.

बाप बेटीच्या पवित्र नात्याला कलंकित करणारी घटना आज उघडकीस आली असून पोलिसांनी नराधम बापास अटक केली आहे,या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार अंढेरा पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या बिट क्र 3 मधील एका गावा मध्ये एका इसमाला एक १३ वर्षांची मुलगी असून ती मुलगी सहा वर्षांची असतांना त्याची पत्नी मयत झाली आणि वडील व मुलगी आजी जवळ राहत असे परंतू यांना किती दिवस सांभाळयाचे म्हणून आजीने मुलाचा दुसरा विवाह करुण दिला,मात्र तो स्त्री लंपट असल्याने त्याचे दुसऱ्या पत्नी सोबत पाहिजे तसे जमत नसल्याने दुसरी पत्नी त्याला सोडून माहेरी गेली आहे व तेथेच राहू लागली आहे,त्यामुळे १३ वर्षांची ती मुलगी वडीला बरोबर आजी जवळ राहून गावातील शाळेत ८ वि मध्ये शिक्षण घेत होती .

२ डिसेंबर रोजी १३ वर्षांची अल्पवयीन मुलगी चिखली शहरात रडत रडत एका रस्त्यावरून जात होती तेव्हा येथील रयत क्रांती संघटनेचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील,सवभिमानीचे नितीन राजपूत,जपे वकील,उद्धव थुट्टे पाटील,छोटू कांबळे व अन्य काही पत्रकारांना ही मुलगी रडत असल्याचे दिसून आले अल्पवयीन मुलगी रडत असल्याचे पाहून त्यांना शँका आली त्यांनी या मुलीस थेट पोलीस स्टेशन ला नेले पोलिसांनी तिला ताब्यात घेवून विचारपूस करीत तिला शहरात राहत असलेल्या तिच्या आत्याच्या घरी पोचवायला गेले असता तिने तिचा स्वीकार करण्यास नकार दिला तिच्या आत्याने पोलीस स्टेशनला येवून सांगू लागली की ही मुलगी वेडसर आहे मात्र मुलीने खरी हकीकत पोलिसांना सांगितली की माझे वडील गेल्या दोन,तीन महिन्यांपासून जबरदस्तीने वारंवार बलात्कार करीत आहेत, त्रास होत असल्याने आत्याला वडिलांची हकीकत सांगण्यासाठी गेली असता उलट आत्याने मला मारहाण केली असे सांगितले, त्यामुळे चिखली पोलिसांनी मुलीला रात्रभर पोलीस स्टेशनला ठेवून आज ३ डिसेंबर रोजी अंढेरा पोलीस च्या स्वाधीन केले अंढेरा पोलिसांनी मुलीच्या नातेवाईक व गुपित चौकशी केली असता ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी आरोपी वडील यांच्यावर कलम ३७६,पोस्को बाल लैंगिक अत्याचार अपराध कलम नुसार गुन्हा दाखल करुण नराधम बापास अटक केली आहे . दरम्यान घडलेल्या घटने मुळे परिसरात खळबळ उडाली असून लोकांमध्ये संताप व चीड व्यक्त केल्या जात आहे,कठोर कारवाई करण्यासाठी आंढेरा पोलीस स्टेशन येथे यावेळी प्रशांत ढोरे पाटील,सुभाष राजपूत,उद्धव थुट्टे पाटील,नितीन राजपूत,योगेश शर्मा,अनिल वाकोडे,मनोज जाधव,स्वप्नील तेजनकर दिवसभर ठाण मारून बसलेले होते. आरोपी ला कडक शिक्षा देण्यात यावी , प्रशांत ढोरे पाटील , आज घडलेली ही घटना फारच दुःखदायक दुर्देवी घटना आहे एक जन्म दाता बापच असे सैतांनी कृत्य करेल या वर विश्वास बसत नाही अश्या आरोपींना वेळीच ठेचले गेल्या पाहिजे अश्या आरोपींना फाशी ची शिक्षा झाली पाहिजे असे रयत क्रांती संघटनेचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील यांनी म्हटले आहे , हैद्राबाद येथील घटना ताजी असतांनाच अशी घटना घडल्यामुळे आरोपींना फाशी ची शिक्षा झाली पाहिजे तेव्हाच अश्या घटना घडणार नाहीं असे ही ते म्हणाले .

570 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close