रायगड

महिला वेषधारी लुटारू पुरुषाला कर्जत रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी केले गजाआड

जयेश जाधव

कर्जत , दि. ०४ :- चोर, लुटारू, ठग रेल्वे प्रवाशांना प्रवासादरम्यान लुबाडण्याच्या नवनवीन क्लुप्त्या वापरत असुन असाच एक पुरुष महिलांची कपडे घालुन उपनगरीय लोकलमधील महिलांच्या डब्यात घुसुन महिला प्रवाशांना लुटत असे. अशाचप्रकारे कर्जत लोकलमध्ये वांगणी ते भिवपुरी रेल्वे स्थानकादरम्यान महिलांचे कपडे घालुन महिलांच्या डब्यातील एका महिला प्रवाशाकडे जबरीने पैसे काढून घेतले बाबतची तक्रार कर्जत रेल्वे लोहमार्ग पोलीसांत आली असता सदर गुन्ह्याबाबत कर्जत रेल्वे लोहमार्ग पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत लोहमार्ग पोलीस उप निरीक्षक डुंबरे, सपोफौ आर. पी. जाधव, पोशि पठाण, पोशि नाईक ह्यांनी गुप्त माहितीच्या आधारे तपास करुन लकी साबुलाल गौतम वय वर्ष २४ ह्या इसमास नेरळ रेल्वे स्थानक परिसरातुन अटक केली असुन सदर इसम हा इंदिरा नगर, दादर पश्चिम येथील रहिवासी आहे. त्याच्यावर कर्जत रेल्वे पोलीस ठाणे CR NO. 261/2019 U/S 392 IPC अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास कर्जत रेल्वे जिआरपी वपोनि कैलास डोंगरे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

18 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close