ताज्या घडामोडी

सार्वजनिक बांधकाम मंडळ ठाणे अंतर्गत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन सा.बां.वि.क्र.२ ठाणे हे कार्य‍ालय जाळणा-या ? अधिका-यांची चौकशी करुन तत्काळ निलंबित करण्यात यावे या मागणी साठी “”आमरण उपोषण””

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

ठाणे , दि. ०४ :- (प्रतिनिधि ) – सार्वजनिक बांधकाम मंडळ ठाणे या कार्यालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व विभागिय कार्यालयातील कार्यकारी अभियंता यांनी तत्कालीन अधिक्षक अभियंता नानासाहेब (एन.एम) पवार यांच्या सहकार्याने महाराष्ट्र शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवुन भ्रष्टाचाराचा अक्षरश: धुमाकुळ घातला आहे.
या मंडळ कार्यालया अंतर्गत १) सा.बां.विभाग क्र १. २)सा.बां. विभाग क्र.२ ३) सा.बां. विभाग पालघर ४) सा.बां. विभाग जव्हार ५) सा.बां.विभाग (आदिवासी) इ. विभागिय कार्यालय कार्यरत असुन या कार्यालया मार्फत झालेल्या डांबराच्या कामात जवळपास ५०% कामे फक्त कागदोपत्री केल्याचे दाखवुन कामे न करताच देयके काढुन घेऊन महाराष्ट्र शासनाची फसवणुक केली आहे. व या कामांच्या देयकांना दुस-या जिल्यातील खोटे डांबराचे चलन जोडुन देयके काढण्यात आली आहेत. या प्रकारात तत्का. अधिक्षक अभियंता नाना पवार यांचा सिंहाचा वाटा मानला जातो. कारण त्यांनी महाराष्ट्र शासना चे सर्व नियम फाट्यावर मारुन अनाधिकृत रित्या देयके काढणा-या कार्यकारी अभियंता सर्वश्री – दिनेश यु. महाजन, जी.एस.गांगुर्डे, राहुल वसईकर , आर.एस. पवार., श्रीमती अनिता परदेशी , प्रदिप दळवी, बि.टि.बडे. यांना पाठिशी घालुन त्यांना भ्रष्टाचारात अनमोल सहकार्य केले. व महाराष्ट्र शासनाला अक्षरश: लुबाडले. सा.बां. मंडळ कार्यालयात नव्याने दाखल झालेले अधिक्षक अभियंता आर.टी . पाटिल यांनी हि तसाच मागिल कित्ता पुढे गिरऊन येरे माझ्या मागल्या करुन भ्रष्टाचाराचा धुव्वा उडवुन टाकला…. महत्वाची गोष्ट म्हणजे आर.टी.पाटिल नाशिक ला कार्यरत आसताना लाचखोरी प्रकरणी चुकिचे काम करून शेतक-यांच्या झालेल्या नुकसानीस जबाबदार धरुन जिल्हाधिकारी कार्यालय नासिक यांनी नेमलेल्या समिति ने या महाशयांना दंड ठोठविला आहे. हि दंडाची रक्कम शासनाला जमा न करता शासनाला खोटेनाटे पत्रव्यवहार करुण शासना ला अंधारात ठेऊन बढत्यावर-बढत्या घेऊन अधिक्षक अभियंता म्हणुन मिरवतात तो भाग वेगळा आहे. तत्कालीन अधिक्षक अभियंता नानासाहेब पवार व सध्या कार्यरत अधिक्षक अभियंता आर.टी .पाटिल यांनी मिळुन सा.बां मंडळ ठाणे ची भ्रष्टाचाररुपी वाट लावली आहे.

या मंडळ कार्यालयाच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणा-या अनेक तक्रारी या विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे तपास कामी पडुन आहे. त्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई झाली नाही म्हणुन भ्रष्टाचार बोकाळला आहे. या भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट करण्या हेतुने? सा.बां. विभाग क्र.२ ठाणे या कार्यालयास आग लागली हि आग शाॅट सर्किटने लागली असे बोलले जाते. मात्र आग लावली काय? याचे पुरावे पोलिसांना उपोषण कर्ते देणार आहेत. या आगित सर्व काढलेले देयके ? जळुन खाक झाल्याची चर्चा आहे..? हि आग सोमवारी दि.९/९/२०१९ पहाटे ४ ते ५ च्या दरम्यान लागली. यात कार्यालयातील सर्व कागदपत्र जळुन खाक झाली अस कार्यकारी अभियंता प्रदिप दळवी यांनी ठाणे नगर पोलिसांना दिलेल्या खबरीत म्हटले आहे. मात्र कोण कोणती कागदपत्र जळाली हे मात्र पोलिसांना सांगण्याचे हे महाशय विसरले ? मात्र भ्रष्टाचाराचे पुरावे जाळुन नष्ट करण्याच्या हेतुने हे कार्यालय जाळल्याचा संशय पत्रकार अनंत पटेकर यांना असुन या मंडळ कार्यालयातील झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशी सह शासकिय कार्यालयास लागलेल्या आगिची त्वरित चौकशी करुन दोषी असणा-या अधिका-यांना तत्काळ निलंबित करण्या साठी अनंत पटेकर (संपादक बहुजन शासन ) व त्यांचे असंख्य सहकारी यांचे वतीने दि. ४/४/२०१९ पासुन जिल्हाधिकारी ठाणे यांच्या कार्यालया समोर १७ दिवस अखंड साखळी उपोषण सुरु केले होते. पण सा.बां. विभागाचे भ्रष्टबुडाचे वरिष्ठ अधिकारी साखर झोपेत ? असल्याने फक्त कागदोपत्री खेळ सुरु करुन चौकशी करण्यास मुद्दाम विलंब करत असल्याने त्यांच्या कासवगती कामकाज पध्दतिमुळे उपोषण करत्यांचा दिशाभुल करण्याचा केविलवाणा प्रयत्न होत आहे. या भिकारचोट कार्यप्रणाली मुळे चौकशी होणार नाही. म्हणुन काल दि. ३/१२/२०१९ पासुन मा. जिल्हाधिकारी कार्यालया समोर ठाणे कोर्ट नाका या ठिकाणी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. आता भ्रष्टाचाराच्या”” फाटक्यात पाय “” घातलाचं आहे त्या मुळे जो पर्यंत ठोस कार्यवाही होउन भ्रष्ट अधिकारी निलंबीत होत नाही, तो पर्यंत आंदोलन सुरु राहिल असं पत्रकार अनंत पटेकर व उपोषण कर्त्यांनी सांगितले आहे.

26 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close