कारंजा तालुका काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न

काँग्रेस कडे इच्छुकांची गर्दी अनेकांनी दिली मुलाखती
प्रतिनिधी – कारंजा (लाड)
कारंजा , दि. ०४ :- आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक संदर्भात विस्तृत चर्चा करण्यासाठी व इच्छुकांचे मते जाणून घेण्यासाठी कारंजा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने पुंजानी कॉम्प्लेक्स येथे दि.०४ डिसेंबर रोजी बैठक संपन्न झाली.
आयोजित बैठकीत काँग्रेसकडून जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असलेल्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. जिल्ह्यातील नेत्यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. आयोजित या बैठकीला राष्ट्रीय काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष अॅड.दिलीप सरनाईक, जिल्हा प्रभारी प्रकाशराव साबळे,काँग्रेस नेते हाजी मो.युसुफसेठ पुंजानी, जिल्हा प्रवक्ते दिलीप भोजराज, अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष अॅड.अंभोरे,कारंजा तालुकाध्यक्ष रमेश लांडकर, कारंजा शहर अध्यक्ष फारूक अली, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष राज चौधरी,सेवादल अध्यक्ष फिरोज प्यारेवाले,कारंजा शहर अध्यक्ष आमिर लाला,शहर उपाध्यक्ष कादर अहेमद खान,आमिर पठाण,माजी जिल्हा परिषद अध्यक्षा ज्योतीताई गणेशपुरे, किरण धामणकर, महिला तालुकाध्यक्ष ललिता थोटांगे,आदीसह तालुका,शहर तसेच विविध आघाडीचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचा संचालन दिलीप सावजी राऊळ यांनी केले तर आभार हमीद शेख यांनी मानले.