गुन्हेगारीजळगाव

नोकरीला लाऊन देतो..1 लाखाची फसवणुक…विशाल सुर्यवंशीवर गुन्हा दाखल…!

शरीफ शेख

रावेर , दि. 04 :- भडगांव येथिल पत्रकार अलिम शौकत शहा वय 30 टोणगांव येथिल रहिवाशी असून दि 09/08/2018 रोजी पासून आय.बी.एन.न्युज महाराष्ट्र लाईव्ह हे चॅनल त्यांनी सुरू केले न्युज चॅनल बातम्यासाठी पत्रकार नियुक्त करत असतांना 10 /11 महिन्यापासून भुसावळ शहरातील बातम्यासाठी विशाल सुरेश (सुरेंद्र) सुर्यवंशी वय 38 रा.कंडारी भुसावळ ता भुसावळ या इसमास नियुक्त केले होते. सुरवातीला विश्वासात घेऊन बर्यापैकी काम करून संपादक अलिम शहा यांचा विश्वास संपादन केला. व नंतर तुमच्या भावला रेल्वेमध्ये लाऊन देतो असे सांगुन अलिम शहा यांच्याकडून 1 लाखाची मागणी केली व आपले काम 6 लाखात होईल असे सांगीतले अलीम शहा यांनी विचार करून सांगतो असे सांगितल्यावर तो अलिमशहा यांच्या मागेच लागला. त्यानंतर दि 20/05/2019 रोजी पैसे घेण्यासाठी भडगाव येथे येऊन अलिम शहा यांनी त्यादिवशी अलिम शहा याने 60,000/- एवढी रक्कम विशाल सुर्यवंशी यास दिली. व दि 13/06/2019 रोजी 40,000/- एवढी रक्कम फोन पे मोबाईलद्वारे अलिमशहा यांनी विशाल सूर्यवंशी याच्या खात्यावर पाठवले. सदर विशाल सुर्यवंशी यांने अलिमशहा यांच्या भावाला कुठेही नोकरीस लावले नाही. नंतर अलिमशहा यांना समजले की, त्यांची फसवणुक झाली आहे. अलिम शहा यांनी पैशाचा तगादा लावल्यावर उलट अलिम शहा यांना त्यांने माझा चॅनल चे पगाराचे पैसे तुमच्याकडे बाकी आहेत असे सांगु लागला. माझा पगार तुम्ही दिला नाही तुमचे कोणते पैसे कुठले काम मला माहित नाही असे सांगु लागला. परत पैशाविषयी बोलायचे नाही माझ्या पत्नीच्या नावाने तुझ्यावर गुन्हा दाखल करून तुला संपवुन टाकेन अशा धमक्या देऊ लागला. तसेच विशाल सुर्यवंशी यांने अलिम शहा यांच्या चॅनलचा डुप्लीकेट लोगो तयार करून चॅनलही चालू केले आहे त्या चॅनलशी माझा कुठलाही संबध नाही व चॅनलमध्ये बातम्या टाकून पैसे उकळत असतो. भविष्यात अलिम शहा यांच्या चॅनलचा गैरवापर करून कोणाचीही फसवणुक होऊ शकते यामुळे विशाल सुर्यवंशी याच्यावर भडगांव येथे भाग 5 गुरनं.144/19Ipc 420 प्रमाणे अलिमशहा यांच्या फिर्यादिवरून गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय येरूळे यांच्या आदेशान्वये पोलीस कॉन्स्टेब किरण ब्राह्मणे करीत आहे.

48 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close