डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्य मराठी पत्रकार संघ व योध्दा प्रतिष्ठानने संयुक्तपणे उपक्रम राबवून बाबासाहेबाना आदरांजली वाहिली
वागदरी – नागप्पा आष्टगी
अक्कलकोट – विश्वमानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्य मराठी पत्रकार संघ व योध्दा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने येथील ग्रामीण रुग्णालयात सोशल डिस्टन्स ठेऊन डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचाऱ्यांना मोफत सॅनिटरी संच वाटप करून बाबासाहेबाना अभिवादन करण्यात आले*.या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक राठोड, सतीश बिरादार,म्हेत्रे,भट्टर परिचारिका शभाना शिकलगार, दुधनिकर, नितीन पाटील, लॅबोरेटरी,शंकर कुंभार,हत्तीरोगकोकणे,चव्हाण,राजू हरवाळकर,राहुल वंजारी,श्रीशैल वंजारी ,आदीजण उपस्थित होते.
आयोजक स्वामींनाथ हरवाळकर यांनी महाराष्ट्र पोलीस,शासकीय डॉक्टर, परिचारिका,पालिका सफाई कर्मचारी यांचा सद्याच्या काळातील पगार दुप्पट करून त्यांना एक कोटींचे विमा संरक्षण देण्याची मागणी पत्रकार संघ,शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने केली.त्याच बरोबर रब्बी पिकांची आणि फळ भाज्यांची शंभर टक्के खरेदी (एमएसपी) किमान आधारभूत दराने करावी शेतकरी,शेतमजुरांना विमा कवच देण्याचीही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ई,मेल द्वारे हरवाळकर यांनी केली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले काळ अत्यंत कसोटीचा असून घरात बसणाराच शर्यत जिंकणार आहे.बेरोजगार,मजूर यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून कांही दानशूर व्यक्ती, संमाजसेविनी त्यांना अन्नदान करीत आहेत, त्यांचेही त्यांनी आभार मानले.