सतीश डोंगरे
सातारा – सह्याद्री वाहिनीवर थेट प्रसारणप्रसंगी बोलताना डॉ. संजय तारळेक , ह्रदय रुग्णांनी कोरोनाची धास्ती न घेता ह्रदयाची पूर्वीची औषधे घेत राहावीत , ती कोणत्याही परिस्थितीत बंद करु नयेत असे आवाहन मायणीचे सुपुत्र व नेरूळ-नवी मुंबई येथील प्रसिद्ध ह्रदयरोगतज्ञ डॉ. संजय तारळेकर यांनी सह्याद्री वाहिनीवर आयोजित केलेल्या थेट प्रसारणप्रसंगी मुलाखतीत बोलताना केले. ते म्हणाले, ह्रदयाच्या रुग्णांनी टीव्हीवर कोरोनाच्या बातम्या मर्यादित पाहाव्यात. सतत बातम्या पाहण्याने ह्रदयावर दडपण येते,व ह्रदयाचे ठोके वाढतात. कोणत्याही प्रकारचा तणाव ह्रदय रुग्णाने घेऊ नये. तणावामुळेही ह्रदयावरचे दडपण वाढते. ह्रदय रुग्णांनी आहारात भाजीपाल्याचा वापर जास्त करावा. वनस्पती तेल डालडा वापरलेले पदार्थ खाऊ नयेत. योग्य प्रकारे व्यायाम घरी करावा. लाँकडाऊन काळात ह्रदय रुग्णाला त्रास वाटल्यास त्याने त्वरीत ह्रदय रोगाची औषधे ज्या डॉक्टरांकडे सुरु आहेत, त्यांच्याशी संपर्क साधावा. त्यांनी दिलेली औषधे सुरु ठेवावीत. कोरोना हा वटवाघूळ प्राण्यापासून निर्माण झालेला विषाणू आहे. यापूर्वी२००२साली अशाच प्रकारचा विषाणू मांजरापासून तर २०१२साली उंटापासून विषाणू निर्माण झाला होता. संसर्ग टाळणे हाच या रोगावरील रामबाण उपाय आहे. लाँकडाऊनमुळे संसर्ग टाळला जातो. जनताही त्यास चांगली साथ देत आहे. प्रत्येकाने आपल्या घरी राहून संसर्ग टाळल्यास कोरोना संपुष्टात येईल असे डॉ. तारळेकर म्हणाले. डॉ. संजय तारळेकर हे मूळचे मायणीचे असून पत्रकार पांडुरंग तारळेकर यांचे चुलतभाऊ आहेत.