Home सातारा पुसेसावळी परिसरातील सातारा जिल्हा बॅकेच्या शाखेत केले गरजू कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूचे वाटप…

पुसेसावळी परिसरातील सातारा जिल्हा बॅकेच्या शाखेत केले गरजू कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूचे वाटप…

286

मायणी – सतीश डोंगरे

सातारा – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा बॅकेच्या शाखांमध्ये गरजू कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.
तरी या परिसरातील कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करुन जिल्हा बँकेने मदतीचा हात पुढे केला असल्याचे चोराडे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.

पुसेसावळी,चोराडे, वडगाव (ज.स्वा),म्हासुर्णे
या गावातील कुटुंबाना पंधरा दिवस पुरेल एवढा धान्यसाठा दिला यामध्ये तेल,तांदूळ,गहू, डाळ
व अन्य वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.

तरी पुसेसावळी सह परिसरातील गरजू लोकांना बॅकेमार्फत घरपोच धान्य देण्याची व्यवस्था करुन अधिकार्‍यांनी प्रत्येक गावातील शाखेत जाऊन जीवनावश्यक वस्तु पोहच केल्या.

यावेळी विकास अधिकारी पी. एस. अहिवळे , चोराडे शाखाधिकारी प्रविण जाधव, बँक सेवक पोपट वाघमोडे ,चोराडे साेसायटीचे चेअरमन विजय पिसाळ, सचिव संजय पिसाळ, दादासो दगडे, माजी सरपंच शिवाजी अवघडे,मा.चेअरमन हणमंत पिसाळ,पत्रकार राजू पिसाळ, विजय पिसाळ, शशिक‍ांत लोणकर,विनोद पिसाळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.