Home सातारा आजपर्यंत देशसेवा केली या सैनिकांनी आपल्या गावाची सेवा करण्याचा घेतला निर्णय…!

आजपर्यंत देशसेवा केली या सैनिकांनी आपल्या गावाची सेवा करण्याचा घेतला निर्णय…!

184

चोराडेतील माजी सैनिक मिट्रीतील पोशाख परिधान करून गावातील चेक पोस्टवर तैनात…. , ग्रामस्थांकडून माजी सैनिकांचे कौतुक

मायणी – सतीश डोंगरे

सातारा – खटाव तालुक्यातील चोराडेत गेल्या आठवडयापासून गावातील प्रमुख रस्ते बंद केले असुन गावातील एका ठिकाणच्या रस्त्यांवर चेक पोस्ट उभे करण्यात आले आहे. तरी या चेक पोस्टवर चोराडे गावातील दोन माजी सैनिकांनी आपला मिट्रीतील पोशाख परिधान करुन कोरोंना विरुद्धच्या लढाईत उतरले आहेत, त्यामुळे गावातील ग्रामस्थां कडून या माजी सैनिकांचे कौतुक केले जात आहे.
चोराडे गावामध्ये आसपासच्या पाच ते सहा गावांचा संबंध येतो,त्यामुळे याठिकाणी किराणा दुकानात, बँकेत, दवाखाना अशा अनेक कामानिमित्ताने बाहेर गावच्या नागरिक ये-जा करीत असतात, तसेच लॉकडाऊनच्या काळात विविध कारणे देऊन गावात ये-जा करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याने गावामध्ये हे चेक पोस्ट उभे करण्यात आले आहे.
तरी चोराडे येथील माजी सैनिक अभिजित पिसाळ व सचिन पिसाळ हे या चेक पोस्टवर येणार्‍या जाणार्‍या लोकांची चौकशी करून गावामध्ये प्रवेश देत आहेत. तसेच गावामध्ये विनाकारण गर्दी करु नका मास्कचा वापर करा अशा सुचना देत आहे.परंतु अनेकदा सांगुन ही काही मास्क वापरत नाहीत त्यांच्यावर दंड आकारण्यात येत असुन तो पावती रुपाने वसुल केला जात आहे.
त्यामुळे त्यांच्या चेक पोस्टवर विनाकारण फिरणाऱ्यांनी मोठा धसका घेतला आहे.
आजपर्यंत देशसेवा केलेल्या या सैनिकांनी आपल्या गावाची सेवा करण्याचा घेतलेल्या निर्णयाचे या परिसरातील ग्रामस्थ व शासकिय स्तरातील अधिकारी वर्गातुन स्वागत होत आहे.