Home महत्वाची बातमी बुलडाणा जिल्ह्यात जंगलात आग लावणारे 7 लोकांवर वन गुन्हे दाखल, वनविभागाची धडक...

बुलडाणा जिल्ह्यात जंगलात आग लावणारे 7 लोकांवर वन गुन्हे दाखल, वनविभागाची धडक मोहिम

180

अमीन शाह

बुलडाणा – 9 मे

उन्हाळ्याचे दिवस सुरु होताच जंगलात मोठ्या प्रमाणात आगी लागण्याचे घटना घडत आहे.ही आग मानवी कारणामूळे जर चुकिने लागली असेल तर ती लवकर अटोक्यात येऊ शकते परंतु असे प्रयत्न फार कमी होतांना दिसून येतात. या वर्षी जंगलात लागणाऱ्या आगीच्या घटनेला वनविभाग गांभिर्याने घेत धडक मोहिम सुरु करून जंगलात आग लागण्यास कारणीभुत 7 लोकांवर वन अधिनयमा प्रमाणे गुन्हे नोंदविले आहे.
बुलडाणा जिल्ह्यात 80 हजार 816 हेक्टरवर वन क्षेत्र आहे. अनेक वेळी जंगलात आग लागल्याची माहिती वनविभागाला मिळते, वन अधिकारी,कर्मचारी घटनास्थळी जाऊन आग विझवून परत येऊन जातात. आता पर्यंत असेच होत आले आहे परंतु या वर्षी जंगलात आग लागल्याचे कारण,व त्याला कारणीभूत कोण? हे समोर आणून त्या व्यक्तिवर वन अधिनयमा प्रमाणे धडक मोहिम राबवून गुन्हे दाखल करण्याचे निर्देश डीएफओ संजय माळी यांनी फायर फाइटर सेलचे प्रमुख व सहायक वनसंरक्षक रणजीत गायकवाड यांच्या मार्फत जिल्ह्यातील सर्व वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना दिले होते. त्या अनुषंगाने एप्रिल व मे या दोन महिन्यात 7 ठिकाणी जंगलात आग लागण्यास जबाबदार 7 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या मध्ये जळगांव जा. वनपरिक्षेत्र अंतर्गत आरोपी सरदार तडवला रा.चारठान,अरुण शंकर सईरिशे रा.भेंडवळ, विठ्ठल विश्वनाथ पाखरे रा.भेंडवळ,मोताळा वनपरिक्षेत्र अंतर्गत अंकुश मोहन चौहान रा.मोहेगांव, खामगांव वनपरिक्षेत्र अंतर्गत कनिराम रेखमल चौहान रा.दस्तापुर तसेच बुलडाणा वनपरिक्षेत्र अंतर्गतच्या ग्राम डोंगरखंडाळा येथील दामोदर भागाजी वाकोडे या 7 आरोपींचा समावेश आहे.या वेगवेगळ्या 7 आगिच्या घटनेत जवळपास 21 हेक्टर वनक्षेत्र जळालेला आहे. यातील 4 घटनेत शेतातील बांध जाळतांना आग जंगलात पसरल्याचे समोर आले.शेतकऱ्यांनी शेतात आग लावतांना जंगलात आग पोहचु नये याची काळजी घेणे गरजेचे आहे.

*जंगलात आग लावणे किंवा आगी साठी कारणीभूत ठरणे हे वन अपराध आहे.आपल्या मुळे जंगलात आग लागू नये याची शेतकऱ्यांनीही दक्षता घ्यावी.भविष्यात जर कोणी जंगलात आग लावली तर त्याच्या विरोधात वनविभाग गंभीर कारवाई करणार,तसेच जंगलात आग,वन्यप्राणी,अतिक्रमण व इतर काही माहिती द्यायची असेल तर हैलो फॉरेस्टच्या 1926 या टोलफ्री नंबरवर आपण संपर्क करू शकता.*
रणजीत गायकवाड
सहायक वनसंरक्षक
बुलडाणा