नाशिक / देवळा – माळवाडी दि. २२ – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व सुविधांचा वणवा बघता मोठ्या शहरांमधून नोकरदार वर्ग आता गावाकडे परतू लागला आहे. त्यात परतलेला नोकरदार वर्ग आप आपल्या नातेवाईक कुटुंबीय याच्या घरी सर्वांच्या सहवासात मोकळ्यापणाने वावर करीत असल्याचे देवळा तालुक्यात दिसून येत आहे. पण याला माळवाडी (ता देवळा) येथील अविनाश बागुल व माणिक बागुल यांचे कुटुंब अपवाद आहे. अविनाश बागुल यांनी १५ मे रोजी परतलेले भाऊ बहीण आणि भाचे यांना फुलेमाळवाडी सरपंच उषा शेवाळे व नवा मळा यांच्या मदतीने मळ्यातील फार्म हाऊस मध्ये दक्षता म्हणून पाणी वीजसह सर्व सोय सुविधां देऊन १४ दिवस क्वारंटाईन रूम तयार करून रोहन, अश्विनी, दिशा आणि सोहम यांना स्वतंत्र ठेवले आहे. नवा मळा यांनी गावांमध्ये माणसांप्रती माणुसकी जपण्यासाठी या काळात कश्या प्रकारे काळजी घेतली जावी याचे औदार्य अन धैर्य दाखवले आहे.
पूर्वी मोठ्या शहरांत नोकरी हा गावी आला की गावातील ग्रामस्थ आवर्जून त्यांची विचारपूस करीत असत. पण कोरोनाच्या भीतीमुळे गावात बहुतांश कुटुंबीय गावात आपल्या घरी परतले आहे. परतलेल्या कुटुंबीयांकडून कोरोना संदर्भात संभाव्य धोका लक्षात न घेता आपल्या कुटुंबियांच्या सहवासात मोकळेपणाने सहवास करीत गावभर फिरत आहे. मात्र या सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता दक्षता म्हणून रोहन बागुल, अश्विनी बागुलसह मुलं बाळ यांनी सर्वांसमोर कोणाच्याही संपर्कात न जाता दोन वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था करून दिलेल्या ठिकाणी आनंदात क्वारंटाईन दिवसांची मजा घेत आहेत.
रोहन बागुल हा मुंबईत नामांकित मेडीकल मध्ये नोकरी करीत होता, तर अश्विनी बागुल यांचे पती मुंबई विमानतळावर सुरक्षा दलात अधिकारी म्हणून सेवा करीत आहेत. पण मात्र अश्विनी बागुल यांचे पती विमानतळावर नोकरी करत असल्याने मुबईत त्यांच्या पतीसह कुटुंबाला स्वतःच्या घरात १० एप्रिल पासून पनवेल महापालिकेने क्वारंटाईन केलेले असतांनाही अश्विनी बागुल यांनी माळवाडी येथे १५ मे पासून स्वतःला स्वतंत्र ठिकाणी क्वारंटाईन करून घेतले आहे.
यावेळी बोलतांना रोहन बागुल यांनी सांगितले की मी खाजगी वाहनांमधून तर माझी बहिण दुसऱ्या दिवशी म्हणजे १६ मे रोजी त्यांच्या दुचाकीवर परतलो. पण आम्ही दोघेही मुंबईत वेगळवेगळ्या ठिकाणी वास्तवात होतो त्यामुळे मूळ गावीही आम्हला आमच्या नवा मळा कुटुंबाने दोन स्वतंत्र ठिकाणी क्वारंटाईन रूम तयार करून दिलेत. अशी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. तसेच रोहन बागुल यांनी पुढं सांगितले की, आम्ही माळवाडी गावात प्रवेश करण्याआधी देवळा येथील कोरोना केअर सेंटर येथे जाऊन आमची वैद्यकीय तपासणीही पूर्ण करून घेतली आहे.
याकामी अविनाश बागुल, सचिन बागुल, अक्षय शेवाळे यांना स्वतंत्र क्वारंटाईन रूम तयार करण्यासाठी नवा मळा माळवाडी, फुलेमाळवाडी सरपंच उषा शेवाळे यांनी सर्व सोयी उपलब्द करून माणुसकीचा नवा आदर्श समाजापुढे उभा करून दाखविला. या नव्या माणुसकीचा देवळा तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कौतुकाचा वर्षाव या माध्यमातून बघावयास मिळाला. तसेच अविनाश बागुल, सचिन बागुल, अक्षय शेवाळे यांची ही कृती अन्य गावांनी आदर्श घेण्यासारखी व अनुकरणीय असल्याचे वाटत आहे.