Home महत्वाची बातमी “कोविड 19 काळात सन्मानपत्राची दुकानदारी””

“कोविड 19 काळात सन्मानपत्राची दुकानदारी””

382

यवतमाळ – कोविड – 19 काळात कवडीचे मदतकार्य न करणाऱ्या संस्था मदतकार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना डिजिटल सन्मानपत्र प्रदान करीत आहेत.त्यामध्ये काही संस्था ह्या ज्यांच कोविड -19 काळात अजिबात काम नाही , योगदान नाही अशा लोकांनासुद्धा स्वतःच्या प्रसिद्धीसाठी सन्मानपत्र प्रदान करत आहेत. काही संस्था किमान 500 रूपये ते 1500 रुपये घेऊन लोकांना डिजिटल सन्मानपत्र प्रदान करून स्वतःची प्रसिद्धी मिळवत आहेत.

या सर्व संस्थांना माझा प्रश्न आहे.

१) तुम्ही स्वतः कोविड – 19 काळात कवडीचे मदतकार्य न करता या सन्मानपत्र इतरांना प्रदान करण्यासाठी लायक आहेत का.?

२) आणि ज्यांचे ‘कोविड – 19 ” काळात अजिबात योगदान नाही अशांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करणे हे तुम्हाला शोभते का.?

प्रामाणिक आणि इमानदारीने , घटनेतील उद्देशानुसार काम करा मित्रांनो नाही तर छपरीगिरी जास्त काळ टिकत नाही.