मायणी – सतीश डोंगरे
सातारा – ‘देव तरी त्याला कोण मारी’ या उक्तीचा प्रत्येय मायणीच्या सागर उत्तम माने या युवकाला मिरज- भिगवण या महामार्गावर सापडलेल्या कासवाच्या बाबतीत आज आला. सापडलेल्या या युवकाने सदर कासवाला वनविभागाच्या मार्फ़त सुरक्षित ठिकाणी सोडले.
यावेळी त्यांनी तातडीने वनविभागाच्या वनरक्षक सौ संजीवनी खाडे यांना याबाबत माहिती देऊन त्यांनी सांगितल्या प्रमाणे सदर कासव वनविभागाचे कर्मचारी राजाराम माने यांच्या उपस्थितीत मायणी येथील ब्रिटिशकालीन तलावात सोडण्यात आले .
“ वाहनाखाली येऊ पाहणाऱ्या कासवाला जीवदान दिल्याचे समाधान झाल्याचे मत सागर माने यांनी व्यक्त केले.”
या कार्यासाठी सागर मानेचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे . यावेळी वनकर्मचारी राजाराम माने,सतीश डोंगरे,दत्ता कोळी, मल्हारी जाधव, सागर घाडगे,ग्रामपंचायत कर्मचारी सुरज खांडेकर,सुशांत सोनवणे उपस्थित होते.