शरीफ शेख
रावेर , दि. ०३ :- येथील फुले,शाहू,आंबेडकर सार्वनिक वाचनालय व ग्रंथालयात भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका,स्त्री शिक्षणाच्या प्रेणेत्या, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणा-या “क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले ” यांची 189 व्या जयंती निमित्त त्याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दिप व धुप पुजा करुन उपस्थितानी अभिवादन केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष हरिष गनवाणी, कामगार नेते दिलीप कांबळे,माजी नगरसेवक ॲड.योगेश गजरे, माजी नगरसेवक महेंद्र गजरे, सामाजिक कार्यकर्ते पंकजभाऊ वाघ,मधुकर बि-हाळे,चेअरमन रावेर जनता को.ऑ.बॅकचे एल.डी.निकम,खान्देश माळी महासंघ तालुकाध्यक्ष पिंटू महाजन,विलास ताठे,लक्ष्मण पाटील, मुख्याध्यापक रविंद्र तायडे, राहुल गाढे,बबलु अवसरमल,बाळु तायडे,,नितीन तायडे,राहुल सुरदास,राहुल राणे,गोपल अटकाळे, अमर पारधे, गणेश चहावाले, यांचेसह मोठया प्रमाणात वाचक वर्ग उपस्थित होता.
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन फुले,शाहू,आंबेडकर सार्व.वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र अटकाळे यांनी तर आभार जितेंद्र ढिवरे यानी मानले.