गंगाखेड / परभणी – कोणत्याही उपचारासाठी सरकारी दवाखाना किती चांगला असा सल्ला जनतेला देणाऱ्या लोकप्रतिनिधींनी स्वतःला कोरोना झाल्यानंतर सरकारी दवाखान्यातच उपचार घेऊन आपला स्वतःचा सरकारी दवाखाना वरील विश्वास सिद्ध करावा. नाहीतर आमदार साहेब तुमचा सरकारी दवाखान्या वर भरोसा नाय काय? असं म्हणायची वेळ जनतेवर येईल अशी प्रतीक्रीया धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक सखाराम बोबडे पडेगावकऱ यांनी केले.
मागील आठ दिवसापासून आमदार खासदारांनाही कोरोनाची लागण झाल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यात आज परभणी जिल्ह्यातील एका आमदाराला ही लागण झाल्याचे सिद्ध झाले. सरपंच नगरसेवकापासून आमदार खासदार व मंत्री त्यांच्याकडे स्वतःच्या मतदारसंघातील मतदार कार्यकर्ते पदाधिकारी आरोग्य सेवेच्या मदतीसाठी जाताच हे लोकप्रतिनिधी मात्र सरकारी दवाखाना उपचारासाठी किती चांगला असा सल्ला देतात. पटऊनही देतात. पण स्वतःला मात्र कोरोनाची लागण होतास सरपंच नगरसेवकापासून ते जि प सदस्य, आमदार-खासदार, मंत्र्यी दर्जा प्रत्येक लोकप्रतिनिधी स्वतःला मेट्रोसिटी मधिल हाय-फाय दवाखान्यात ट्रीटमेंटसाठी दाखल करून घेत आहे. स्वतःला लोकप्रतिनिधी समजणारे हे सर्व लोक स्वतःवर वेळ आल्यास मात्र पंचतारांकित खासगी रुग्णालयाची वाट धरत आहेत. यावरून या लोकप्रतिनिधींचा सरकारी आरोग्य सेवेवर विश्वास नसल्याचे सिद्ध होत आहे. एकूणच त्यांचं हे असं वागणं म्हणजे त्यांचा सरकारी दवाखान्यातील डॉक्टर विश्वास नाही का? असं म्हणायचं का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. काल परभणी जिल्ह्यातील एक आमदारांची कोरोणा टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी स्वतःला मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादेत स्वतःला हलवल.