अनिल गोठी – मलकापुर
मलकापुर , दि. २३ :- गेल्या अनेक महीन्यांपासुन एस.टी.व एस.टी.कामगारांच्या गंभीर समस्या निवेदनाव्दारे सातत्याने मांडून देखील शासन व एस.टी.प्रशासन यांनी दखल न घेता एस.टी.प्रशासनाने एस.टी.कामगारांच्या समस्या सोडवणे तर सोडाच पण कर्मचारी कपात,स्वेच्छा निवृत्ती,वेतन कपात,सक्तीच्या रजा,इ.स.२०१९मधील कर्मचारी भर्ती मधील कामगार,कर्मचारी यांना स्थगीती असे एकाधिकारशाहीचे प्रकार चालवत असल्याने अगोदरच कोरोना महामारीमुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या एस.टी.कर्मचारी यांना सहानुभुतीने न सांभाळता एकाधिकारशाही वापरुन त्रास देण्याचे धोरण एस.टी.प्रशासनाने चालवले आहे.या सर्व बाबींचा विचार करुन महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेने राज्यव्यापी स्वाक्षरी अभियान आज दि.23 जुलै पासुन सुरु केले असुन महाराष्ट्र अध्यक्ष हरीभाऊ माळी,सरचिटणीस मोहन चावरे,कार्याध्यक्ष विकास आकलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भात प्रदिप गायकी विदर्भ सचिव यांच्या नेतृत्वात राज्यव्यापी स्वाक्षरी अभियानाची धडाकेबाज सुरवात झाली आहे,या स्वाक्षरी अभियानात बुलडाणा जिल्हाअध्यक्ष गजानन ठोसर, जिल्हाउपाध्यक्ष अॅड विनोद पाटील,अमोल बाणाईत,मिडीया प्रमुख गणेश डोके. म.न.से.मा.तालुका अध्यक्ष दत्ता टेंभुर्णे,मा.उपाध्यक्ष भागवत ऊगले , म.न.से.युवा नेते अजय बेलोकार , शहराध्यक्ष सागर जगदाळे,उपाध्यक्ष निकेतन वाघमारे यांनी बहुसंख्येने एस. टी. कर्मचारी यांच्या स्वाक्षर्या घेतल्या.या अभियानाला एस.टी.कामगारांचा ऊत्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.