अमीन शाह
अकोला , दि. ०५ :- मूर्तिजापुर तालुक्यातील सांगवी या गावातील ई क्लास जमिन अतिक्रमण वरुन वाद होऊन दोन गटात तुंबळ मारहाण झाली असता यात एकाचा मृत्यू झाला असून दुर्योधन खांडेकर वय ४८ मृतक व्यक्तीचे नाव असून तर अनेक जण गंभीर जखमी असल्याची घटना काल रात्री ३ वाजताच्या सुमारास घडली आहे. जखमींना उपचारासाठी अकोला पाठविण्यात आले आहे.
सांगवी येथील गावाजवळील गायरान जमीनीवर गेल्या अनेक वर्षापासून दुर्योधन खांडेकर यांचे अतिक्रमण असून यात एका समुहाचा विरोध होत असल्याने त्यांनी काल रात्री ३ च्या सुमारास दुर्योधन यांच्या घरावर हल्ला चढविला यात दुर्योधन गंभीर जखमी झाला होता त्याला वेळेवर उपचार अभावी त्याचा गावातच मृत्यू झाला. तर त्यांचे 2 मुले एक भाऊ पुतण्या असे गंभीर जखमी आहे.यावर मुर्तीजापुर ग्रामीण पोलिसात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.