Home विदर्भ एकाचा जागीच मृत्यू तर एक जखमी.!

एकाचा जागीच मृत्यू तर एक जखमी.!

120

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

जखमीला वर्धा येथे केले दाखल…!

वर्धा – जिल्ह्यातील विरुळ पुलगावआर्वी रोडवर धनोडी फाट्याजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे. गणेश बेलखडे वय ५५ व शरद चाफले वय ५२ हे दोघेही आर्वी येथे दुचाकी क्रमांक MH-२९ AG- 617 ने जात होते. दरम्यान पुलगावकडून भरधाव येणाऱ्या ट्रक क्रमांक MH 31-CB -5551 ने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात गणेश बेलखडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर शरद चाफले गंभीर जखमी झाले. त्यांना वर्धा येथे दाखल करण्यात आले आहे. ट्रकसह चालकाला आर्वी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी आर्वी पोलिस स्टेशनचे निरीक्षक संपत चव्हाण व कर्मचारी हजर होते. पुढील तपास आर्वी पोलिस करीत आहे.