Home बुलडाणा पत्रकार दिनानिमित्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ सोबत प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा

पत्रकार दिनानिमित्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ सोबत प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा

186

अमीन शाह

शेगाव , दि. ०७ :- आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी रोजी सुरू केलेल्या मराठी वृत्तपत्रा निमित्त संपूर्ण राज्यभर हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो शेगावात यानिमित्ताने शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांची भेट घेऊन पत्रकारांनी त्यांच्या सोबत चर्चा केली.

सकाळी सर्वप्रथम माऊली स्कूल ऑफ स्कॉलर्समधे ज्येष्ठ पत्रकार प्रेरणास्त्रोत बाळशास्त्री जांभेकर यांचा अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर प्रेस क्लब शेगावच्या पदाधिकाऱ्यांनी शेगाव संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचून त्यांच्यासोबत चर्चा केली यावेळी भाऊंनी विविध विषयांवर चर्चा करून पत्रकारांनी सकारात्मक पत्रकारितेकडे आपला कल द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी यावेळी प्रेस क्लब, शेगाव चे संस्थापक संजय सोनोने, अध्यक्ष राजेश चौधरी,उपाध्यक्ष अविनाश दळवी,सचिव संजय त्रिवेदी, कोअर कमेटी सदस्य फहीम देशमुख, नानाराव पाटील, कोषाध्यक्ष धनराज ससाने,सहसचिव मंगेश ढोले, संघटक संजय ठाकूर,सतीश अग्रवाल, पत्रकार डॉ जावेद हुसेन शाह, राजवर्धन शेगावकर, सिद्धार्थ गावंडे, प्रकाश उन्हाळे, प्रदीप सनांसे, , उमेश शिरसाट, प्रशांत खत्री राजकुमार व्यास, भगवंत पुरी , ललित देवपुजारी, नितीन घरडे, राजू गाडोदिया, विलास राऊत, सुधाकर शिंदे आदींची यावेळी उपस्थिती होती.