रावेर (शरीफ शेख)
25 मार्चपासून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभर अनेक उपाय योजना करण्यात आल्या. 1) सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली.
2) ऑफिस, दुकाने, हॉटेल, मार्केट इत्यादि ज्यामुळे लोकांचा आपापसांतील संपर्क कमी होईल अशा प्रकारे सर्व व्यवहारांवर निर्बंध घालण्यात आले.
या चार महिन्यातील कोरोनाच्या प्रसाराचा अभ्यास केल्यानंतर कोरोनाच्या प्रसाराचा पॅटर्न लक्षात घेऊन कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. गरीब व हातावर पोट असलेल्या बहुसंख्य लोकसंख्येचा रोजगार व एकूणच उद्योग व्यवसाय व अर्थ व्यवहार तातडीने सुरू करण्याची आवश्यकता आहे.
कोरोना विरुद्ध लढण्याची प्रतिकार क्षमता अंदाजे 80 % लोकांनी दाखवली आहे. 15% लोक वैद्यकीय उपचाराला प्रतिसाद देऊन करोनाचा मुकाबला करण्यात यशस्वी झाले आहेत.5 % लोक vulnerable आहेत. हे अद्ययावत वैद्यकीय उपचार देऊनही ही नियंत्रणात आणता येत नाहीत वैद्यकीय दृष्ट्या गंभिर होत आहेत वा बळी पडत आहेत. अशा मागणीचे निवेदन आगार प्रमुख एन.टी.बेंडगुळे, तहसिलदार
उषाराणी देवगुणे,व पोलिस निरिक्षक,रावेर यांना रावेर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,सरकारने या 15 % + 5 % = 20 % लोकांना आरोग्यसेवा पुरविण्यासाठी सर्व प्रयत्न केंद्रित केले पाहिजेत व कोरोना नियंत्रणाच्या नियोजनाचे हे सूत्र ठेवले पाहिजे.
100 % लोकसंख्येवर निर्बंध घालण्याचे आर्थिक दुष्परिणाम समोर आले आहेत. अर्थव्यवस्था संकटात आहे. 80 % पेक्षा अधिक लोकसंख्येला बेरोजगारी व उपासमारीचा सामना करावा लागतो आहे. गेल्या चार महिन्यांचा आढावा घेऊन सरकारने काही निर्णय तातडीने घेतले पाहिजेत अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अगोदरच केलेली आहे.
कोरोना रोखण्यासाठी जे आरोग्य विषयक सुरक्षिततेचे नियम आहेत त्याचे काटकोर पालन करत सर्व व्यवहार चालू करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करत आहे.
एसटी, बस व सर्व शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा सरकारने त्वरित सुरु कराव्यात अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करत आहे. गणपती उत्सवासाठी खाजगी बस
वाहतूकीचे बुकींग सुरुवात झाले आहे. खाजगी सेवा चालू होत असतील तर सरकारने वाहतूक सेवा सुरू करण्यात काय अडचण आहे ? सरकारने एसटी व बस च्या सेवा तुरळक प्रमाणात सुरू केल्या आहेत परंतु त्या फारच अपुऱ्या आहेत. सार्वजनिक वाहतूक सेवेअभावी लोकांची अतिशय गैरसोय होत आहे. दुसरे म्हणजे सध्या घातलेली जिल्हा बंदीही ताबडतोब उठवावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करत आहे.निवेदनाच्या रवाना प्रत,मा. तहसिलदार सो.रावेर,मा.पोलिस निरिक्षक सो,रावेर,मा. आगार प्रमुख सो,रावेर यांना दिले आहे.
निवेदनावर व. ब. आ. रावेर ता. अध्यक्ष बाळू राजाराम शिरतुरे व.ब.आ.रावेर ता महिला आघाडि सो. ऊषा सुरदार,विनोद तायडे, सुरेश अटकाळे,अर्जुन वाघ, विजय करवले,किरण बावीस्कर, अक्षय तायडे, चंद्रकांत भालेराव, अखलेश तायडे, अजय तायडे, राजु तायडे, विशाल तायडे, राजकुमार इंगळे, सोनु कोंघे यांच्या सहया आहे.