रावेर (शरीफ शेख)
१५ ऑगस्ट१९४७ या दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला. आज आपल्याला स्वतंत्र मिळून ७३ वर्ष पूर्ण होवून ७४ वा स्वतंत्र दिन साजरा करून पदार्पण करीत आहोत.स्वतंत्र मिळाल्या नंतर देशाच्या सीमेवर असलेले सैनिकांचे देशासाठी त्यांनी दिलेले योगदान व शौयाचा स्वतंत्रदिना निमित्ताने सन्मान व्हावा या उद्देशाने मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशन तर्फे माजी सैनिक नाईक श्री.सि.डी.पाटील व डी.एम.बडगुजर या माजी सैनिकांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष फिरोज शेख यांचा हस्ते जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,जळगांव या ठिकाणी सन्मान करण्यात आला.
या वेळी चेतन निंबोळकर,श्री.मेढे,जिनल जैन, उपस्थित होते.