Home मराठवाडा अट्टल चोरटा अडकला सिटी चौक पोलिसांच्या जाळयात

अट्टल चोरटा अडकला सिटी चौक पोलिसांच्या जाळयात

148

अनेक गुन्हे उघडकीस….

अब्दुल कय्युम

औरंगाबाद , दि. ०९ :- पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून शाहगज भागातील भाजी मंडी येथे पोलिसांनी सापळा रचून एका अट्टल चोरट्यास मोठ्या शिताफीने पकडले असून त्याच्या कडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे .

या संदर्भात पोलीस विभागा कडून मिळालेल्या माहिती नुसार येथील शाहगंज भागात राहणारा अट्टल चोरटा शेख जावेद उर्फ जे. के. हा अनेक दिवसांपासून फरार होता त्याच्यावर गुन्हे दाखल होते तो भाजी मंडी येथे येणार असल्याची गुप्त माहिती पो.उ. नि. पाथरकर यांना मिळाली असत त्यांनी वरिष्ठ अधिकारी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद , उप आयुक्त निकेश खटमोडे पो निरीक्षक , एस. बी. पवार व आपले सहकारी यांच्या मदतीने सापळा रचून शेख जावेद यास अटक केली आहे त्याने रस्त्याने पायी जात असताना एका महिलेची पर्स हिसकावून पोबारा केला होता अशी कबुली त्याने दिली आहे याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शेख सययद हे करीत आहे.