Home मराठवाडा ग्रामीण रुग्णालय पाथरी येथे ताणतणाव मुक्त मानसिक आरोग्य शिबीर कार्यक्रम संपन्न

ग्रामीण रुग्णालय पाथरी येथे ताणतणाव मुक्त मानसिक आरोग्य शिबीर कार्यक्रम संपन्न

672

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

परभणी / पाथरी , दि. ०९ :- राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम ,जिल्हा रुग्णालय परभणी जिल्हा शल्य चिकित्सक परभणी सामान्य रुग्णालय परभणी व जिल्हा आरोग्य अधिकारी परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने ताणतणाव मुक्त मानसिक आरोग्य शिबीर कार्यक्रम ग्रामीण रुग्णालय पाथरी येथेआयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष पाथरी पंचायत समितीचे सभापती सौ. कल्पनाताई सदाशिवराव थोरात होत्या ,प्रमुख पाहुणे म्हणून अनिलभाऊ नखाते ,सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरी हे होते तसेच श्री सदाशिव थोरात जन्मभूमी फाउंडेशन पाथरी, श्री नितेश भोरे नगराध्यक्ष नगर पालिका पाथरी,अल्ली अफसर अन्सारी सदस्य रूग्ण कल्याण समिती ग्रामीण रुग्णालय पाथरी ,डॉ जगदीश शिंदे ,डॉ रवि शिंदे उपस्थित होते या कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ एस एन वाघ वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय पाथरी यांनी केली त्यांनी आपल्या प्रस्तावनेत असे तणाव ग्रस्त लोकांनी सतत कामे करणे टाळा विश्रांती घ्यावी सकारात्मक विचार करावा व्यसनापासून दूर राहावे.

सरकारी दवाखान्यातिल वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांची माहिती दिली प्रमुख पाहुणे सदाशिव राव थोरात यांनी जमलेल्या लोकांना नैराश्य आले असेल तर दारू पिऊ नये ,जी व्यक्ती घरामध्ये चिडचिड करत असेल अश्या व्यक्ती नि मानसिक आरोग्य अधिकारी यांचा सल्ला घ्यावा असे आवाहन केले डॉ तारेख अन्सारी मनोविकार तज्ञ सामान्य रुग्णालय परभणी यांनी ज्या लोकांना नैराश्य येत आहे आणि कामामध्ये लक्ष लागत नाही ताणतणाव वाढला आहे अश्या लोकांनी १०४ या टोलफ्रि नंबर वर माहिती विचारावे मानसिक आजार विषयी माहिती दिली जाते लोकांनी या १०४ टोल फ्रि नंबर चा उपयोग करून घ्यावा असे आव्हान केले या कार्यक्रमात ग्रामीण रुग्णालय पाथरी डॉ राजेन्द्र वाकणकर, डॉ आर एस जाधव, डॉ राजेंद्र कोल्हे , राजेभाऊ खेत्री, मधुकर खरात ,विक्रम धायजे रामदास वडजे अशोक पाईक राव, तालुका आरोग्य अधिकारी ऑफिस मधील अहेमद अन्सारी, कदम साहेब दत्ता इंगळे युनुस शेख सुरेश वाघमारे, अकबर पठाण, जोगदंड ,सलीम शेख, शकील खान इत्यादी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.