तब्बल १८ तसा नंतर सापडला मृतदेह….
अमीन शाह
बुलडाणा : साखरखेर्डा येथील एका शाळेचा शिपाई ३ शिक्षकांसोबत पलढग धरणावर पार्टी करण्यासाठी काल १५ सप्टेंबरला गेले असता , पोहण्यासाठी उतरलेल्या शिपाई याचा मृतदेह तब्बल १८ तासानंतर आज दुपारी आढळून आला आहे.
मृतक दिलीप वैराळे हा साखरखेर्डा येथील जिजामाता विद्यालय येथे कार्यरत होते. या विद्यालयाचे शिक्षक पुरषोत्तम मानवतकर, कुवंरसिंग चव्हाण, अशोक गवई व शिपाई दिलीप वैराळे हे चौघे तरोडा हद्दीतील ज्ञानगंगा अभयारण्यातील पलढग धरण येथे जेवण करण्यासाठी गेले होते. दिवसभर तेथे थांबल्यानंतर बोरखेड येथील मंदीरालगत च्या नदीत शिपाई दिलीप वैराळे आंघोळीसाठी पाण्यात उतरला. मात्र बराच वेळ तो पाण्याबाहेर आला नाही. त्यामूळे त्याची शोधाशोध सुरु झाली. सोबतचे ३ शिक्षक मात्र सुखरूप आहेत. आज १६ सप्टेंबरला सदर शिक्षक व गावकऱ्यांनी बुलडाणा ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. दरम्यान पोलिस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आल्याने आज दुपारी १२ वाजता शिपाई दिलीप चा मृतदेह पाण्यावर तरंगतांना दिसून आला. या घटनेची माहिती देवूनही बचाव पथक घटनास्थळी पोहचलेले नव्हते. मृतक दिलीप वैराळे यांच्या पश्चात पत्नी, २ मुले असा परीवार असून घटनेमूळे गावात शोककळा पसरली आहे.