Home राष्ट्रीय श्री.गुरुनानक जयंतीच्या राष्ट्रपती श्री . रामनाथ कोविंद यांनी दिल्या शुभेच्छा

श्री.गुरुनानक जयंतीच्या राष्ट्रपती श्री . रामनाथ कोविंद यांनी दिल्या शुभेच्छा

147

नवी दिल्ली , दि. ३० :-  श्री.गुरुनानक जयंतीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या संदेशात राष्ट्रपती म्हणाले, “श्री.गुरुनानक जयंतीनिमित्त देशातील जनतेला आणि परदेशातील सर्व नागरिकांना विशेषतः शीख समुदायातील बंधू आणि भगिनींना अभिवादन करत आहे आणि शुभेच्छा देत आहे.

गुरुनानक देव यांचे जीवन आणि शिकवणूक सर्व मानवजातीचे प्रेरणास्थान आहे. त्यांनी लोकांना ऐक्य, सुसंवाद,बंधुत्व, एकोपा आणि सेवा यांचा मार्ग दाखविला आणि परीश्रम, प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान यावर आधारीत जीवनशैली समजून घेण्याचे आर्थिक तत्त्वज्ञान सांगितले.

गुरुनानक देव यांनी ‘एक ओमकार’ हा मूलमंत्र आपल्या अनुयायांना दिला आणि जाती,धर्म,आणि लिंग यांच्या आधारे भेदभाव न करता सर्वांशी समान वर्तणूक करण्याचा आग्रह धरला. त्यांच्या ‘नाम जपो,कीरत करो आणि वंद छाको,’ या संदेशात त्यांच्या सर्व शिकवणीचे सार आले आहे.

गुरुनानक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या शिकवण आचरणात आणून त्यानुसार वागण्याचा आपण सर्व जण प्रयत्न करु या”