Home मराठवाडा नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर कार्यवाही

नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर कार्यवाही

188

अब्दुल कय्युम

औरंगाबाद , दि. १५ :- नायलॉन मांज्याच्या विक्रीवर बंदी असतांना देखील त्याची विक्रीकरणार्‍या दोन दुकांनवार मंगळवारी ( दि. १४ ) जिन्सी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने छापा मारुन कारवाई केली.

दुकानातुन ३५ हजार रुपये किंमतीचा नायलॉन मांजा पोलिसांनी जप्त केला आहे. अजयसिंग भिमसिंग चिरोटे ( ४९ , रा.संजय नगर) व सुनिल नरसिंग राजपूत ( ४५ , रा. गवळीपुरा) अशी नायलॉन मांजा विक्री करणार्‍या दुकान दारांची नावे आहेत. त्यांच्या विरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई ठाण्याचे निरीक्षक व्ही.एम. केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक दत्ता शेळके , रफी शेख , संपत राठोड , हवालदार हारुण शेख , पोलिस नाईक संजय गावंडे , शिपाई गणेश नागरे , सुनिल जाधव यांनी केली.